सावंतवाडी : शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने वतीने उद्या दि. १४ सप्टेंबर रोजी फुगडी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती मात्र सदर स्पर्धा काही महत्त्वाच्या कारणास्तव तूर्त स्थगित करण्यात आली आहे. सदर फुगडी कार्यक्रम येत्या दसऱ्याच्या काळात दि. ६ ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार आहे, अशी माहिती विधानसभा मतदारसंघ प्रमुख रूपेश राऊळ यांनी दिली.
गौरी गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर फुगडी स्पर्धा आयोजित करून कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पुढाकार घेतला होता. या स्पर्धेसाठी महिला मंडळांनी नोंदणी केली होती. मात्र काही अडचणींमुळे ही स्पर्धा दसऱ्याच्या काळात दि.६ ऑक्टोबर रोजी मोठ्या जल्लोषात घेण्यात येणार आहे, असे रूपेश राऊळ यांनी सांगितले.