माडखोल टेंबवाडीत भरदिवसा घरफोडीचा थरार! ; कुलूप फोडून रोख रक्कम व कागदपत्रांची चोरी

सावंतवाडी : तालुक्यातील माडखोल-टेंबवाडी येथे भरदिवसा घरफोडीची घटना घडली असून, अज्ञात चोरट्याने घराचे मुख्य दरवाजाचे कुलूप फोडून घरात प्रवेश करत १२ हजार रुपयांची रोख रक्कम आणि महत्त्वाच्या कागदपत्रांची फाईल लंपास केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. २० जुलै २०२६ रोजी दुपारी १२ ते ३ वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. माडखोल-टेंबवाडी येथील नंदू दळवी यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप बाजूला असलेल्या टिकावाच्या साहाय्याने तोडण्यात आले. त्यानंतर घरातील चावीचा वापर करून कपाट उघडण्यात आले आणि त्यातील १२ हजार रुपयांची रोख रक्कम तसेच महत्त्वाच्या कागदपत्रांची फाईल अज्ञात चोरट्याने चोरून नेली.

या प्रकरणी सावंतवाडी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली आहेत.

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण, उपनिरीक्षक श्री. लोहकरे, जमादार मनोज राऊत आणि हवालदार सुरेश धोत्रे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच फॉरेन्सिक पथक, श्वान पथक आणि ठसेतज्ज्ञांनी घटनास्थळी भेट देत पुरावे संकलित करून तपासात मदत केली.

या घरफोडीप्रकरणी सावंतवाडी पोलिस अधिक तपास करत आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles