सावंतवाडीत २३ जुलै रोजी अन्नसुरक्षा प्रशिक्षण व प्रमाणपत्र शिबिराचे आयोजन.

सावंतवाडी : अन्न व्यवसाय करणाऱ्या व्यापारी, उद्योजक आणि व्यावसायिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणारे अन्नसुरक्षा प्रशिक्षण व प्रमाणपत्र शिबीर गुरुवार, दि. २३ जुलै रोजी सावंतवाडीत आयोजित करण्यात आले आहे. सावंतवाडी तालुका व्यापारी, उद्योजक व व्यावसायिक संघ यांच्या वतीने हा कार्यक्रम दुपारी २ ते सायंकाळी ६ या वेळेत नगरपालिकेच्या इंदिरा गांधी व्यापारी संकुलातील बॅ. नाथ पै सभागृहात होणार आहे.

या प्रशिक्षण शिबिरात पुणे येथील खाद्यपदार्थ तज्ज्ञ, अन्नसुरक्षा सल्लागार व प्रशिक्षक श्री. अकुंश जोगदंड हे मार्गदर्शन करणार असून, सुरक्षित अन्ननिर्मिती, अन्नसुरक्षा नियम, आवश्यक प्रमाणपत्रे, आरोग्य संरक्षण तसेच अन्न व्यवसायाशी संबंधित विविध महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर माहिती देण्यात येणार आहे.

या प्रशिक्षणासाठी किराणा दुकानदार, हॉटेल व खानावळ चालक, बेकरी, मिठाई, कोल्ड्रिंक्स, फास्ट फूड व चायनीज पदार्थ विक्रेते, वडापाव, समोसा, भजी, चहा विक्रेते, कॅटरर्स, मासे, चिकन, मटण, अंडी व दूध विक्रेते, फरसाण उत्पादक, विविध धान्यांपासून पीठ तयार करणारे उद्योग, पाणी बाटली व पिण्याचे पाणी विक्रेते अशा सर्व प्रकारच्या अन्न व्यवसायिकांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या शिबिरात सहभागी होणाऱ्या व्यावसायिकांना प्रशिक्षणासह आवश्यक प्रमाणपत्राबाबत मार्गदर्शन मिळणार असून, अन्नसुरक्षा कायद्याचे पालन आणि ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हे प्रशिक्षण अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.

कार्यक्रमाला उपस्थित राहताना आधार कार्ड व त्याची झेरॉक्स प्रत सोबत आणावी, असे आवाहन सावंतवाडी तालुका व्यापारी, उद्योजक व व्यावसायिक संघाचे अध्यक्ष जगदीश मांजरेकर यांनी केले आहे. तसेच सर्व संबंधित अन्न व्यवसायिकांनी या उपयुक्त प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असेही त्यांनी नमूद केले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles