अजित मठकर यांचा वाढदिवसाचा अनोखा आदर्श! ; केक नव्हे, समाजसेवेलाच दिलं प्राधान्य, सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानला केली आर्थिक मदत!

सावंतवाडी : वाढदिवस म्हणजे केवळ आनंदोत्सव आणि जल्लोष नव्हे, तर समाजाप्रती आपली जबाबदारी जपण्याचीही एक सुंदर संधी असते, याचा प्रेरणादायी आदर्श विरांश टूर अँड ट्रॅव्हलर्सचे मालक अजित मठकर यांनी घालून दिला. आपल्या वाढदिवसानिमित्त त्यांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या सेवाभावी उपक्रमांसाठी ₹८ हजारांची देणगी देत समाजसेवेचा अनोखा संदेश दिला.

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या विविध सामाजिक, शैक्षणिक आणि गरजूंना मदतीच्या उपक्रमांना नेहमीच अजित मटकर यांचे मोलाचे सहकार्य लाभत आले आहे. यंदाही वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी सेवाकार्यात खारीचा वाटा उचलत समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित केली.

यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. सतीश बागवे यांनी अजित मटकर यांचे मनःपूर्वक आभार मानत, अशा सामाजिक जाणिवेतून दिलेले योगदान इतरांसाठीही प्रेरणादायी असल्याचे सांगितले.

या प्रसंगी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव, लक्ष्मण कदम, रूपा मुद्राळे, पियुष टिळवे, रुपेश परब, चिरायू टोपले, शरद साळगावकर आणि पावलू डिसोजा उपस्थित होते.

“वाढदिवसाचा आनंद समाजसेवेतून साजरा करा” हा संदेश देणाऱ्या अजित मठकर यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles