वेंगुर्ले तालुक्यात दुर्मिळ महाबळेश्वर खापर खवल्या सापाची सुरक्षित सुटका.

वेंगुर्ले :  तालुक्यातील मातोंड गावातील एका बागेत काम करणाऱ्या कामगाराला एक दुर्मिळ सरपटणारा प्राणी आढळून आला. संबंधित कामगाराने जागरूकता दाखवत त्या सापाला कोणतीही इजा न करता सावंतवाडी येथील सर्पमित्र नवीद हेरेकर यांच्याशी संपर्क साधला. तसेच आपल्या मोबाईलद्वारे त्या सापाचे छायाचित्र काढून श्री. हेरेकर यांना पाठविले.

छायाचित्र पाहताच श्री. हेरेकर यांनी तो साप महाबळेश्वर खापर खवल्या (Mahabaleshwar Shieldtail) असल्याचे ओळखले. हा साप बिनविषारी असून अत्यंत दुर्मिळ प्रजातींपैकी एक मानला जातो.

श्री. हेरेकर यांनी कामगाराला सापावर सुरक्षित अंतर ठेवून लक्ष ठेवण्यास सांगितले. त्यानंतर ते तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि त्या सापाला सुरक्षितपणे पकडून मानवी वस्तीपासून दूर त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडले.

या घटनेत संबंधित कामगाराने दाखविलेली जागरूकता आणि सर्पमित्र श्री. नवीद हेरेकर यांनी केलेल्या तत्पर बचावकार्यामुळे दुर्मिळ वन्यजीवाचे प्राण वाचले. वन्यजीव आढळल्यास त्यांना इजा न करता त्वरित प्रशिक्षित सर्पमित्र किंवा वन विभागाशी संपर्क साधावा, असेही त्यांनी आवाहन केले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles