- ✍️ अक्षय धुरी.
सावंतवाडी : कोकणचे सुपुत्र तथा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण, विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर, तसेच पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत उबाठा गटाचे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ प्रमुख विक्रांत सावंत व तसेच सावंतवाडी तालुकाप्रमुख मायकल डिसोजा यांनी आपल्या असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यासमवेत भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश करत कमळ हाती घेतले. या दोघांचा पक्ष प्रवेश घेत भाजपाने सावंतवाडी तालुक्यात ठाकरे सेनेला जोरदार धक्का दिला आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश महत्वाचा ठरणार आहे.

सावंतवाडी तालुक्यात आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमिवर पक्ष प्रवेशाचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होत आहेत. अशातच भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. रविद्र चव्हाण यांनी आपल्या पहिल्याच कोकण दौऱ्यात सावंतवाडी तालुक्यात मोठा धक्का दिला असून ठाकरे शिवसेनेच्या मोठ्या पदाधिकारी व कार्यकर्त्याना भाजपमध्ये प्रवेश दिला आहे.
यात काॅग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष कै. विकास सावंत याचे चिरंजीव तथा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विक्रात सावंत व गेली अनेक वर्ष ठाकरे सेनेशी एकनिष्ठ काम करत असलेले माजी जिल्हा परिषद सदस्य तथा विद्यमान तालुकाप्रमुख मायकल डिसोजा या दोघांनी रविंद्र चव्हाण व मंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन कमळ हाती घेतले. दोघांच्या रुपाने तालुक्यात ठाकरे सेनेला जोरदार धक्का बसला असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडीत भाजपची ताकद वाढली आहे.
विक्रांत सावंत यांना सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात मानणारा मोठा वर्ग असून त्यांच्या समवेत माजगाव ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच संजय कानसे व प्रा. केदार म्हसकर यांनी प्रवेश केला.

तर मायकल डिसोजा यांच्या समवेत कोलगांवचे माजी पंचायत समिती सदस्य आणि विद्यमान कोलगाव विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचे सदस्य मेघश्याम काजरेकर, व्हाईस चेअरमन थॉमस डिसोजा, उपतालुका प्रमुख शिवसेना तथा चेअरमन संदीप ऊर्फ बाळू माळकर, उपविभाग प्रमुख भरत सावंत (कुणकेरी), युवा सेना उपतालुका प्रमुख शैलेश टिळवे, माजी युवा सेवा उपतालुका प्रमुख निशिकांत पडते,विद्यमान ग्रामपंचायत सदस्य शिवदत्त घोगळे, मारिया डिमेलो,गौरी करमळकर, प्रतिक्षा धुरी (कोलगाव), श्रीम. सेजल कारिवडेकर (कारिवडे)
माजी सरपंच रश्मी काजरेकर, उज्वला सावंत (कोलगाव),माजी ग्रामपंचायत सदस्य मनोहर ठिकार, सोनू कासार,नितीन शिरसाट (कोलगाव), माजी शाखा प्रमुख सुधाकर चव्हाण (कोलगाव), सर्वेश परब (आंबेगाव),रविंद्र परब (कारिवडे) कोलगाव विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या विद्यमान सदस्य श्रीम. शुभांगी घोगळे,देवस्थान मानकरी महादेव राऊळ (कोलगाव),बुथ प्रमुख चिन्मय जाधव,रुपेश परब, दिनेश सावंत,सुदेश राणे (कोलगाव), योगेश रेडकर,उमेश भालेकर, बाळा बोभाटे (कारिवडे),विनोद सावंत, अनिल परब (कुणकेरी), संजय जंगले (आंबेगाव) माजी शिवसैनिक बबन डिसोजा, डॉमनिक डिसोजा, मनिष नाईक,आबा खेडेकर, संतोष लिंगवत,नारायण राणे,बस्त्याव गोम्स,गोपाळकृष्ण फोंडबा,गोविंद करमळकर,सिद्धेश केदार, संतोष बोभाटे,प्रताप गावडे,सत्यवान लिंगवत,दिपक परब,मधुकर परब, शिवा परब,जीजी सावंत, उमेश परब,राहुल राणे, संदेश कारिवडेकर, झिलू करमळकर,सुनिल फोंडबा, रोहीत बिले,विलास गवळी, आणि श्री. संजय हनपाडे यांनी प्रवेश केला.
तर
यावेळी रोणापाल ग्राम पंचायतचे माजी सरपंच प्रकाश गावडे ग्रामपंचायत सदस्य नंतर किशोर नेमळ तंटामुक्ती अध्यक्ष सुदिन गावडे यांच्यासह विष्णू तूयेकर निलेश नाईक प्रदीप नाईक अमित गावडे यांनीही भारतीय जनता पार्टी प्रवेश केला.
तसेच कुडाळ तालुक्यातील काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी देखील आज भारतीय जनता पार्टी प्रवेश केला यात शिवसेनेचे जिल्हा संघटक रूपेश पावसकर, प्रसाद नार्वेकर – युवासेना तालुका प्रमुख तथा माणगाव विभागप्रमुख,किशोर सावंत – विभागप्रमुख नेरूर,नरेश नेरुरकर – विभागीय संघटक नेरूर,संतोष परब – शिवसेना विभागीय संघटक ओरोस यांच्यासह कल्पेश मार्गी,अमरसिंह कदम,कृष्णा पाटकर,सतीश सावंत . दिपाली नारिंग्रेकर,शीला नारिंग्रेकर, वैभव तोरस्कर,शरद तोरस्कर, सचिन हळदणकर,महेश हळदणकर दिलीप वेतोरेकर,विलास पाटकर
नागेश पाटकर,सतीश राऊळ, अक्षय मार्गी,रामदास मार्गी, महेश भगत,मृगद्या हळदणकर, सायली हळदणकर,विलास हळदणकर,वैशाली विलास हळदणकर,हर्षद राजन हळदणकर, रेशमा राजन हळदणकर,चंद्रभागा वामन हळदणकर,रुपेश पेडणेकर, महेश तोरस्कर,संतोष नेरुरकर, दीपक नारिंग्रेकर,स्वाती भगत,अनुजा भगत,प्रकाश भगत,बंटी भगत,विलास मार्गी,विलास तोरस्कर,राजा मार्गी,तुषार नेरुरकर, गोविंद नेरुरकर,श्रीकृष्ण नारिंग्रेकर
काजल राऊळ,रवी तोरस्कर,जागृती तोरस्कर,मिहीर मार्गी,मयूर आडेलकर,मिलिंद आडेलकर
आनंद लिंगे,गुरुनाथ मार्गी, अक्षय मार्गी,बाळा (महादेव) देऊळकर,नाना देऊलकर,गणाधीश गोसावी,अजय कदम,निलेश कदम, राजू राणे,प्रदीप राणे, शांताराम राणे,बबन भाटकर, प्रदीप चंदवणकर,उमेश कोरगावकर
बाबी तुळसकर,शंकर मेस्त्री यांचा समावेश आहे.
तर मालवण तालुक्यातील रामगड ग्रामपंचायतचे सरपंच शुभम मटकर यांच्यासह सुधीर मिटबावकर अनंत कामतेकर मोहन गाडेगावकर दिनेश कामतेकर रवींद्र कामतेकर धाकू मेस्त्री आरती कामतेकर वैभवी मालवणकर संगीता मिडगावकर अंकिता वाघ अक्षता मिस्त्री लक्ष्मी मिस्त्री चिन्मय कामतेकर विश्वेश परडकर अविकेश वाघ आदींनी प्रवेश केला.
या सर्वांचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण तसेच पालकमंत्री नितेश राणे यांनी भारतीय जनता पार्टीत स्वागत करीत त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. पक्षांमध्ये त्यांचा मान सन्मान राखला जाईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी त्यांना दिली.


