सावंतवाडी : तालुक्यातील रोणापाल गावातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आणि उबाठा सेनेचे असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ यांनी आज सावंतवाडी येथे युवा नेते विशाल परबांच्या माध्यमातून संपन्न झालेल्या भाजपा जनसंपर्क कार्यालयाच्या शानदार उद्घाटन समारंभ प्रसंगी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज भाजप पक्षात प्रवेश केला आहे.
यावेळी रोणापाल ग्रामपंचायत सदस्य नंदकिशोर राजाराम नेमण, रोणापाल तंटामुक्ती अध्यक्ष सुदिन मोहन गावडे, विष्णू प्रकाश तुयेकर, सुशांत दशरथ गावडे (उबाठा बुथ प्रमुख), निलेश नाईक, चंद्रकांत धर्णे, संतोष कोळापटे, उमेश तुयेकर (रोणापाल राष्ट्रवादी बुथ प्रमुख), प्रदीप नाईक, संजय गोठसकर, कृष्णा नाईक, अभय गावडे, कल्पेश नाईक, सचिन कुबल, उदय गावडे,अमित गावडे, दीपक परब, श्याम गावडे, सुरज गोठसकर, अक्षय कोळापटे, प्रथमेश कानडे, दत्ताराम पायनाईक, शंकर नाईक, भगवान नाईक, प्रकाश गावडे यांनीही भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.


