

सावंतवाडी : तालुक्यातील कलंबिस्त गावातील तब्बल अडीचशे ग्रामस्थ आज माजी मंत्री आ. दीपक केसरकर, जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या उपस्थितीत शिवसेनेत दाखल झाले आहेत. आज कलंबिस्त गावात हा महाप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी विधानसभा प्रमुख प्रेमानंद देसाई, तालुका प्रमुख दिनेश गावडे, अजय गोंदावळे, परीक्षित मांजरेकर, विनोद सावंत, अर्चित पोकळे यांसह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रघुनाथ सावंत यांनी केले.


