सावंतवाडी: आमदार दीपक केसरकर आज खऱ्या अर्थाने मैदानात उतरले असून कलंबिस्त येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. तसेच आज रात्री दोडामार्ग उबाठा गटाच्या महिला तालुकाप्रमुख सौ. श्रेयली गवस यांनीही असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेचा शिवधनुष्य हाती घेतला आहे.

यावेळी माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी त्यांचे शिवसेनेत स्वागत केले. यावेळी जिल्हाध्यक्ष संजू परब, विधानसभा प्रमुख प्रेमानंद देसाई, दोडामार्ग तालुका प्रमुख गणेशप्रसाद गवस, महिला जिल्हाप्रमुख ॲड. नीता सावंत कविटकर, उपजिल्हाप्रमुख राजू निंबाळकर, उपजिल्हा प्रमुख शैलेश दळवी, तालुका संघटक गोपाळ गवस, उपतालुका प्रमुक दादा देसाई, भगवान गवस, रामदास मेस्त्री, बबलू पांगम, बाळा नाईक, विनायक शेट्ये, विशांत तळवडेकर, संजय गवस, सज्जन धाऊसकर, सावंतवाडी महिला शहराध्यक्ष भारती मोरे, युवा सेनेचे विधानसभा प्रमुख अर्जित पोकळे, परीक्षित मांजरेकर, विनोद सावंत, तिलंकांचन गवस, संदीप गवस यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान मांगेली ग्रामपंचायत सदस्या तथा उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या महिला तालुकाप्रमुख श्रेयाली गवस यांच्यासह सुभाष गवस, नारायण ठाकूर, महिला विभाग प्रमुख मांगेली सावली ठाकूर, मालेश गवस, सौ. अनुजा गावडे, सोनाली गवस, चंद्रकांत ठाकूर ( हेवाळे) ओमकार गवस, सुनील गवस, विजय उर्फ रामा पडते ( झरेबांबर गावठाण) तसेच मांगेलीचे प्रवीण तुकाराम सावंत यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला आहे


