- ✍️ साबाजी परब.
- सावंतवाडी : ‘महायुती’ होणार की नाही याबाबत सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात चर्चेला उधाण आले असतानाच सावंतवाडीच्या सामाजिक कार्यकर्त्या तथा दिवंगत आमदार जयानंद मठकर यांच्या स्नुषा सीमा मठकर येत्या १३ नोव्हेंबर रोजी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मुंबई येथे मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार असल्याची खात्रीलायक माहिती ‘सत्यार्थ’च्या हाती आली आहे.
दरम्यान सीमा मठकर यांच्या ‘मठकर’ परिवाराचे सावंतवाडी शहरात बऱ्यापैकी वलय असल्याने त्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक उमेदवार आहेत. एकीकडे महायुतीत अजून युतीबाबत निर्णय झालेला नसल्याने सीमा मठकर आगामी काळात नक्कीच आघाडी घेण्याची चिन्हे आहेत.


