कणकवली : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे यांच्या वतीने आयोजित शिक्षक व अधिकारी कर्मचारी विविध स्पर्धा सन २०२५/२६ संपन्न झाल्या. यात मैदानी क्रीडा स्पर्धेतमध्ये श्री. बयाजी महादेव बुराण (क्रीडा शिक्षक / पर्यवेक्षक – माध्यमिक विद्यामंदिर कनेडी) यांनी सहभाग घेऊन ‘भाला फेक’ या क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक प्राप्त केला. आता कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली आहे. श्री. बुराण यांचे कनेडी गटशिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित- माध्यमिक विद्यामंदिर कनेडीचे संस्थाध्यक्ष सतीश सावंत व सर्व कार्यकारी मंडळ, शालेय समिती चेअरमन श्री. आर. एच. सावंत व सर्व सदस्य मुख्याध्यापक प्राचार्य सुमंत दळवी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
तसेच त्यांचे शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ, सिंधुदुर्ग तसेच आणि तमाम क्रीडा शिक्षक, क्रीडा प्रेमी यांनी अभिनंदन केले आहे.


