Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

‘या’ लोकांचे रेशन कार्ड १ ऑक्टोबरपासून होणार कायमचे रद्द.!

नवी दिल्ली : सरकार मार्फत नागरिकांसाठी विविध योजना आणल्या जातात यातील. असे सगळ्यात मोठी आणि फायद्याची योजना म्हणजे रेशन कार्ड योजना. अशातच आता रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी सरकारकडून समोर आलेली आहे. ती म्हणजे आता पुढील महिन्यापासून लोकांना राशन मिळणार नाही. ज्या लोकांनी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत ई केवायसी केले नाही. त्यांना ऑक्टोबर महिन्यापासून रेशन मिळणार असल्याची माहिती समोर आलेली आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार 30 सप्टेंबरपर्यंत जर तुम्ही राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत ई केवायसी केले नाही. तर तुम्ही पुढील महिन्यात धान्य मिळण्यासाठी पात्र ठरणार नाही. तसेच 31 ऑक्टोबरपर्यंत जे ई केवायसी करणार नाही. त्यांचे पूर्ण रेशन कार्ड रद्द केले जाणार आहे. जर राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतून तुमची नावं वगळली, तर तुमचे रेशन कार्ड देखील रद्द केले जाणार आहे. त्यामुळे जर तुम्ही अजूनही ई केवायसी केले नसेल, तर तुम्ही लवकरात लवकर हे काम करून घ्या. अन्यथा तुमच्या रेशन कार्ड बंद होऊ शकते.

आता राष्ट्रीय अन्न सुरक्षा या योजनेअंतर्गत रेशन मिळवण्यासाठी कुटुंबियांसाठी पीओएस मशीन द्वारे नोंद असलेल्या कुटुंबातील सर्व सदस्यांची केवायसी करणे आवश्यक आहे. याद्वारे रेशन कार्डमध्ये नाव असणाऱ्या सर्व सदस्यांची ई-केवायसी बायोमेट्रिक तपासणी केली जाते. याबाबत सर्वोच्च न्यायालयाकडून आदेश देण्यात आलेले आहे. आणि त्यांच्या आदेशाचे पालन केले बंधनकारक केलेले आहे.

केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार जे लोक केवायसी प्रक्रिया पूर्ण करणार नाहीत. त्यांना इथून पुढे राशन दिले जाणार नाही. तसेच जर तुम्ही ऑक्टोबर महिन्यापर्यंत ही प्रक्रिया पूर्ण केली नाही. तर तुमचे राशन कार्ड देखील रद्द केले जाईल. संपूर्ण राज्यात रेशन दुकानात ई केवायसी करण्यासाठी सध्या गर्दी पाहायला मिळत आहे. परंतु जर अजूनही तुम्ही केवायसी केले नसेल, तर लवकरात लवकर करून घ्या. यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या स्वस्त धान्य दुकानात आधार कार्ड घेऊन जावे लागेल. तुमचे एक केवायसी आधार कार्ड लिंक झाल्यानंतरच प्रक्रिया पूर्ण होणार आहे त्यानंतर ग्राहकांच्या बोटांचे ठसे घेतले जाईल. सरकारकडून 30 सप्टेंबर पर्यंत ई केवायसी पूर्ण करण्याचे आव्हान देण्यात आलेले आहेत. जर तुम्ही ई केवायसी केले नाही, तर तुम्ही यांपासून वंचित रहा त्यामुळे आता लवकरात लवकर करून घ्या.

ADVT – 

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles