सावंतवाडी: तालुक्यातील नेमळे येथील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या जागृत देवस्थान श्री देवी सातेरी देवस्थान चा वार्षिक जत्रोत्सव बुधवार दिनांक 12 नोव्हेंबर रोजी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न होणार आहे.
धार्मिक परंपरेचे पावित्र्य:
श्री देवी सातेरी हे एक जागृत देवस्थान असून माहेर वासिणीची वोटी भरण्याची जत्रा तसेच नवसाला पावणारी देवी म्हणून प्रसिद्ध आहे. मनोभावे बोललेला नवस पूर्ण करण्यासाठी हजारो भाविक मोठ्या श्रध्येने सकाळपासूनच देवीच्या दर्शनासाठी उपस्थित राहून जात्रोत्सवाचा लाभ घेतात . भाविकांच्या या निष्ठेमुळे या सोहळ्याचे पावित्र्य अधिक वाढते.
जत्रोत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळपासून विविध धार्मिक विधी आणि कार्यक्रमांना सुरुवात होईल.
रात्री: देविची पालखी काढण्यात येईल, ज्यामध्ये मोठ्या संख्येने भाविक सहभागी होऊन पालखी मिरवणुकीचा आनंद घेतात.
रात्रौ मनोरंजन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा भाग म्हणून सुप्रसिद्ध आजगांवकर दशावतार नाट्य मंडळाचे नाटक सादर होणार आहे.
देवस्थानचे मानकरी यांच्याकडून सर्व भाविकांनी या पवित्र जत्रोत्सवाचा आणि आयोजित केलेल्या धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांचा मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नेमळे श्री देवी सातेरी देवस्थानचा उद्या वार्षिक जत्रोत्सव!
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


