Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

हृदयद्रावक – विसर्जन मिरवणुकीपूर्वीच ट्रॅक्टरखाली येऊन तीन मुलींचा मृत्यू ; ‘या’ गावात शोककळा.

धुळे : राज्यभरात गणेश विसर्जन मिरवणुकांचा उत्साह असून मुबंई, पुण्यासह राज्यभरात गोवागोवी गणपती बाप्पांना निरोप देण्याची तयारी सुरू आहे. त्यासाठी, गावात ट्रॅक्टर, ट्रॉली, ढोलीबाजा, मिरवणुकीतील ढोलपथकांची रेलचेल दिसून येत आहे. गणेश मंडळांचे कार्यकर्ते एकत्र जमत बाप्पांच्या मिरवणुकीची जय्यत तयारी करत आहेत. मात्र, जिल्ह्यातील धुळे  शहराजवळ असलेल्या चितोड गावांमध्ये गणेश विसर्जनाची मिरवणूक निघण्यापूर्वीच मोठी दुर्घटना घडली. गावातील एका ट्रॅक्टर खाली येऊन तीन चिमुकल्या मुलींचा जागीच दुर्दैवी अंत झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे गणेश विसर्जन मिरवणुकांच्या उत्साहावर दु:खाचं सावट पसरलं असून गावात शोककळा निर्माण झाली आहे.  दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

गणेश विसर्जनाच्या मिरवणूक निघण्यापूर्वीच गावात उभ्या असलेल्या ट्रॅक्टर टालीच्या भीषण अपघाताच्या घटनेने गावात स्मशान शांतता पसरली आहे. ट्रॅक्टरवर चढून ड्रायव्हरने तो सुरू केला, मात्र या ट्रॅक्टरच्या आजुबाजूला असलेल्या तीन चिमुकल्या मुलींच्या अंगावरुन हा ट्रॅक्टर गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. इथे उभ्या असलेल्या ट्रॅक्टरजवळ या मुली खेळत असताना हा भीषण अपघात घडला आहे. या घटनेमध्ये एक महिला देखील गंभीरित्या जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तसेच इतर पाच ते सहा जणांचा देखील दुखापत झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळे, हा अपघात नेमका कसा झाला, गाडीच्या ड्रायव्हरच्या लक्षात कसं आलं नाही, याचा तपास सुरू आहे. या घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस अधिकाऱ्यांनी चितोड गावात धाव घेऊन पाहणी करुन ट्रॅक्टर ताब्यात घेतला आहे. तसेच, ड्रायव्हरला ताब्यात घेतलं असून चौकशी सुरू आहे. या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये एक मुलगी 4 वर्षांची,एक 7 आणि एक 14 वर्षांची, अशा तीन मुली असून एक महिला देखील गंभीररित्या जखमी झाली आहे. याप्रकरणी, पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू असून घटना नेमकं कशी घडली, याचा तपासही सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, गणेश विसर्जनादिवशीच घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles