ख्रिस्ती बांधवांच्या वियानी कप २०२४ चा अर्चना घारे – परब, बिशप ऑल्विन बरेटो यांच्या हस्ते शानदार शुभारंभ.!

सावंतवाडी : नवश्री पशुपालन केंद्र सावंतवाडी येथे डायोसेन युथ कमिशन आयोजित ख्रिस्ती बांधवांसाठीच्या वियानी कप २०२४ चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ. अर्चना घारे-परब आणि बिशप ऑल्विन बरेटो यांच्या हस्ते मशाल पेटवून करण्यात करण्यात आले. वियानी कप २०२४ ही क्रिडा स्पर्धा असून गेली ८ वर्षे हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. या स्पर्धेत मुलांबरोबरच मुली महिलांच्या संघाचा सहभाग देखील मोठ्या प्रमाणात होता. यावेळी उपस्थित खेळाडूंना सौ. अर्चना घारे-परब यांनी मार्गदर्शन केले.

सौ. घारे पुढे म्हणाल्या, सद्याच्या धकाधकीच्या जीवनात व तंत्रज्ञान युगात शारीरिक तंदुरुस्ती राखणे आवश्यक आहे. याकडे बहुतांश लोक दुर्लक्ष करतात. त्यांच्यासाठी खेळ हेच एक प्रभावी माध्यम आहे. ज्यातून शरीर तंदुरुस्त राखले जाते, असे प्रतिपादन सौ. घारे यांनी यावेळी केले. या कार्यक्रमास डायोसेन युथ कमिशनचे युथ डायरेक्टर – फादर कॅजिटन रॉड्रिग्ज, महिला युथ डायरेक्टर सबीना अँनीमेटर आणि युथ प्रेसिडेंट हेरमॉस रॉड्रिग्ज, फादर अँलेक्स, फादर रिचर्ड सालदान्हा, कॅथलिक बँक सोसायटीचे सेक्रेटरी मार्टिन अल्मेडा, बावतीस फर्नांडिस, मारिता फर्नांडिस, नॉबर्ट माडतीस, विवेक गवस आणि खेळाडू, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles