Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

गरीबांची व्यथा कळताच क्षणाचाही विलंब न करता मदतीला धावणारे दातृत्वशाली नेतृत्व म्हणजे विशाल परब.! – अमित वेंगुर्लेकर.

सावंतवाडी : सध्याच्या परिस्थितीत फार कमी समाजकारण व कित्येक पटीने अधिक कट राजकारण घडवणुकीची परिस्थिती समोर दिसत आहे.सर्वसामान्य गोरगरीब आपल्या व्यथा मांडण्यासाठी जेव्हा एखाद्या राजकीय पदाधिकाऱ्यांकडून मदतीची मागणी करतो तेव्हा दहा वेळा विचार करून निर्णय पक्का करून आपलं काम तिथून पक्क होणारच या आशेनं त्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयातून बाहेर निघतो, परंतु त्याच पदाधिकाऱ्यांचे काही समर्थक वेगळ्याच विचारांचे असतात आणि यामुळे राजकीय क्षेत्रातील चढाओढींमध्ये निवडणुकीच्या आखाड्यात निव्वळ अशा कार्यकर्त्यांच्या चुकीच्या पद्धतीने पदाधिकारी यांच्याकडे जनतेच्या निदर्शनास चुकीचे समज निर्माण होतात.
या सर्व कार्यपद्धतीचा अपवाद म्हणजे भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष श्री. विशालजी परब आहेत. शहरातील न्यू खास्कील वाडा गावडे शेत येथील एका गरजू कुटुंबीयांना आपल्या मुलीच्या आजारासाठी आर्थिक सहकार्याची अपेक्षा होती आणि याबाबतची माहिती माननीय विशाल परब यांना समजताच क्षणाचाही विलंब न करता या दानशूर व्यक्तीने तातडीने त्यांच्या बँक खात्यात आर्थिक मदत पाठवली तसेच जीवनावश्यक वस्तूं त्या कुटुंबियांच्या घरी पोहोच केल्या.
तसेच पीडित कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती सुरळीत होईपर्यंत दर महिना जीवनावश्यक वस्तू घर पोच करण्यात येणार असल्याचे आश्वासन विशाल परब यांनी सबंधित कुटुंबीयांना दिले आहे.
अशा या विशाल नेतृत्व असलेल्या श्री विशाल परब याची सामाजिक कार्य पद्धती जनसामान्य लोकांच्या मनात नेहमीच आपुलकी व जिव्हाळा निर्माण करणारी आहे. या बाबत मानवाधिकार न्याय सुरक्षा संगठन तर्फे प्रदेश सचिव श्री अमित वेंगुर्लेकर यांनी विशाल परब यांचे जाहीर आभार मानत पुढील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील कारकिर्दीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles