Tuesday, December 23, 2025

Buy now

spot_img

मामाच बनले कंस मामा!, जमिनीच्या तुकड्यासाठी भाच्यासोबत असं काय घडलं? ; धक्कादायक प्रकरण समोर!

कानपूर : कधीकधी पैशांचे अमिष माणसला वाईट कृत्य करायला भाग पाडते. अशीच एक काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. अचानक पोलिसांना फोन आला की फ्लॅटमध्ये तरुणाचा मृतदेह आढळला आहे. या मृतदेहाचे हात-पाय बांधून ठेवले होते. तसेच तोंडही झाकले होते. पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृतदेह पोस्टमॉर्टन करण्यासाठी पाठवला. पण त्यांना मृत तरुणाची ओळख पटली नव्हती. मृतदेहाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच त्याचे कुटुंबीय पोलीस ठाण्यात पोहोचले. ही धक्कादायक घटना कानपूरमधील कल्याणपूर पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात घडली आहे.

येथील एका रिकाम्या प्लॉटमध्ये तरुणाचे हात-पाय बांधलेले मृतदेह सापडला होता. संशयित खून जमिनीच्या वादावरून झाल्याचा अंदाज आहे. मृत तरुणाचे नाव विपिन तिवारी (वय 30 वर्षे) असून, तो पान मसाला कारखान्यात काम करत होता. मंगळवारी रात्री कारखान्यातून घरी परतताना तो बेपत्ता झाला होता. बुधवारी सकाळी स्थानिक नागरिकांनी रिकाम्या प्लॉटमध्ये मृतदेह सापडल्याची माहिती पोलिसांना दिली होती.

हात-पाय बांधलेल्या अवस्थेत मृतदेह –

मृतदेहाचे हात-पाय दोरीने बांधलेले होते, गळ्याभोवती देखील दोरी गुंडाळलेली होती. चेहरा पिशवी टाकून झाकून ठेवला होता आणि त्यावर दगडांचा थट रचून चेहरा लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. सोशल मीडियावर मृतदेहाचे फोटो व्हायरल झाल्याने विपिनचे वडील गंगा प्रसाद तिवारी, पत्नी आणि दोन जुळी लहान मुले घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेहाची ओळख पटवली.

आरोपींची माहिती –

या प्रकरणात मुख्य आरोपी विपिनची आई रामसुती आणि त्यांचे चुलत भाऊ सुरेश व संतोष (विपिनचे मामा) असल्याचे समोर आले आहेत. रामसुती यांना माहेरकडून मिळालेली 12 बीघा जमीन, जी आता डिफेन्स कॉरिडॉरमध्ये येण्यामुळे कोट्यवधींची झाली आहे. नुकत्याच 60 लाख रुपयांत झालेल्या जमिन विक्रीत आरोपींनी हिस्सा मागितला होता, ज्यामुळे वाद सुरू होता.

पोलिसांची कारवाई –

पोलिसांना स्थानिकांकडून माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला गेला. विपिनच्या वडिलांनी जमिन वादातून खून झाल्याची तक्रार दिल्यानंतर आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दक्षिण डीसीपी डी.एन. चौधरी म्हणाले, “शव खाली प्लॉटमध्ये सापडले होते ज्यात हात-पाय बांधलेले होते. शवाची ओळख पटली आहे. कुटुंबीयांच्या तक्रारीवर आधारित कारवाई सुरू आहे.” वडील गंगा प्रसाद तिवारी यांनी सांगितले की, जमिन वादामुळे आरोपी नातेवाईकांनी हा खून केला. पोलिस तपास सुरू असून, कुटुंब न्यायाची वाट पाहत आहे.

 

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles