मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलचे विभागीय शालेय डॉजबॉल स्पर्धेत उत्तुंग यश! ; सिंधुदुर्ग जिल्ह्याचे केले प्रतिनिधीत्व!

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थिनींनी विभागीय शालेय डॉजबॉल स्पर्धेमध्ये सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर उल्लेखनीय कामगिरी बजावली. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्गद्वारा आयोजित विभागीय शालेय डॉजबॉल स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल ओरोस येथे पार पडल्या. या विभागस्तरीय शालेय डॉजबॉल स्पर्धेमध्ये 17 वर्षे खालील मुली या वयोगटात मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलच्या संघाने क्रीडा शिक्षक भूषण परब यांच्या मार्गदर्शनाखाली आपले क्रीडा कौशल्य दाखवत कोल्हापूर, सांगली या बलाढ्य संघांना पराभूत करून द्वितीय क्रमांक पटकावला.

क्रीडा अधिकारी नीलिमा अडसूळ व सहाय्यक क्रीडा अधिकारी सचिन रणदिवे यांनी संघाच्या या कामगिरीबद्दल शुभेच्छा दिल्या.
या यशाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीमंत राजेसाहेब खेमसावंत भोंसले ,चेअरमन श्रीमंत राणीसाहेब शुभदादेवी खेमसावंत भोंसले,कार्यकारी विश्वस्त श्रीमंत लखमराजे भोंसले , विश्वस्त युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले व मंडळाचे संचालक श्री दिलीप देसाई , मंडळाचे सहाय्यक संचालक ॲड. शामराव सावंत, मंडळाचे सदस्य श्री जयप्रकाश सावंत ,डॉ.सतीश सावंत ,मुख्याध्यापिका श्रीमती अनुजा साळगावकर तसेच प्रशालेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ,पालक शिक्षक संघ कार्यकारी समितीचे सदस्य यांनी अभिनंदन केले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles