सावंतवाडी : चौकुळ ग्रामस्थांसाठी आजचा दिवस फार महत्त्वपूर्ण ठरला आहे. मंत्री दीपक केसरकर यांच्यामुळेच आज अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या आणि चौकूळवासियांच्या जिवाभावाचा प्रश्न बनलेला कबुलायतदार – गावकर प्रश्न सुटला आहे. सावंतवाडी तालुक्यातील चौकुळ कबुलायतदार-गावकर प्रश्नावरून जमीन वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी शासनाकडून ६५ गाव प्रमुखाचा समावेश असलेली समिती गठीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्या समितीच्या माध्यमातून कुटुंब निश्चिती करून जमिन वाटप प्रक्रिया राबविण्यात यावी, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे आयोजित बैठकीत जाहीर केले. गेली अनेक वर्षे रखडलेला प्रश्न सुटल्यामुळे उपस्थित चौकुळ ग्रामस्थांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय..!’ अशा घोषणा देत जोरदार जल्लोष केला. तसेच हा प्रश्न सोडवण्यासाठी सकारात्मक भूमिका घेणाऱ्या मंत्री दीपक केसरकर व महायुती शासनाचे आभार मानले.

यावेळी पुढील १०० वर्षात होणारा विकास लक्षात घेता, या गावात रस्ते, पर्यटन स्थळ तसेच विविध प्रकल्प डोळ्यासमोर ठेवून गावाचा विकास करावा. गाव जो काही निर्णय घेईल त्याला आपला पाठिंबा असेल, असे केसरकर यांनी जाहीर केले.

माहिती शासनाच्या माध्यमातून चौकुळ गावाला गेली अनेक वर्षे भेडसावणारा प्रश्न सोडवण्यासंदर्भात शासन अध्यादेश काढण्यात आला आहे. या अध्यादेशाबाबत माहिती देण्यासाठी श्री. केसरकर यांनी आज चौकुळ ग्रामस्थांची बैठक घेतली. यावेळी उपस्थित ग्रामस्थांना त्यांनी झालेल्या शासन निर्णय स्वतः वाचून दाखवला. यात गावाच्या मागणीप्रमाणे गावकर ही पद्धत कायम ठेवून एकत्र सातबारा पद्धती कायम ठेवून जमीन वाटपास परवानगी देण्याचा शासन निर्णय घेण्यात आला. या पार्श्वभूमीवर तब्बल ६५ प्रमुख लोकांचा समावेश असलेली समिती गठीत करण्यात आली. त्या माध्यमातून २३४३ हेक्टर खाजगी वन असलेली जमीन आणि ४७९७ हेक्टर कबुलायतदार गावकर म्हणून असलेली जमीन सम प्रमाणात वाटप करण्याबाबत सकारात्मक भूमिका घेण्यात आली असल्याचे जाहीर केले. त्या शासन अध्यादेशाचे पत्र गावातील प्रमुख मानक-यांना प्रदान करण्यात आले. यावेळी केसरकर यांनी सकारात्मक भूमिका जाहीर केल्याचे समजतात उपस्थित गावकऱ्यांनी जल्लोष केला. मंत्री दीपक केसरकर यांचे आभार मानले. तसेच त्यांच्यामुळे हा प्रश्न सुटला. त्यामुळे त्यांना पुढच्या राजकीय वाटचालीत यश प्राप्त होवो, अशा शुभेच्छा यावेळी देण्यात आल्या.
यावेळी केसरकर यांनी ग्रामस्थांना आवाहन केले १०० वर्षे पुढे दूरदृष्टी ठेवून गावाचा विकास लक्षात घेता गावातील रस्ते, पर्यटन स्थळे यांचा विकास करण्यात यावा. तसेच दूध, मध यासारखे पारंपारिक व्यवसाय टिकावे. यासाठी योग्य ते प्रयत्न करण्यात यावेत. त्या संदर्भातील प्रकल्प उभारण्यासाठी आवश्यक ती जागा सोडण्यात यावी. याबाबत ग्रामस्थ जो काही निर्णय घेतील त्याला आपला पूर्ण पाठिंबा राहणार आहे. लवकरच याबाबत समिती गठीत करून जमीन वितरित करण्यासंदर्भात धोरण ठरवण्यात यावे. एकत्र सातबारा करण्यास मान्यता देण्यात आली आहे. परंतु लोकांना वेगवेगळे सातबारा हवे असतील तरी त्याचा निर्णय संबंधित समितीने घ्यावा, असेही ते म्हणाले.
याबाबत ग्रामस्थ जो काही निर्णय घेतील त्याला आपला पूर्ण पाठिंबा राहणार आहे. लवकरच याबाबत समिती, असे यावे केसरकर यांनी उपस्थित ग्रामस्थांना आवाहन केले. यावेळी नूतन जिल्हाधिकारी अनिल पाटील, प्रांताधिकारी हेमंत निकम, तहसीलदार श्रीधर पाटील, सीईओ श्री. देशमुख, सामाजिक कार्यकर्ते दिनेश गावडे, भरत गावडे, ६५ समिती सदस्यांपैकी सोनू गावडे, विठ्ठल गावडे, भिकाजी गावडे, बापू गावडे, वासुदेव गावडे, तुकाराम गावडे आदीसह संपूर्ण अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.


