Tuesday, December 23, 2025

Buy now

spot_img

वक्त हमारा था, हमाराही रहेगा!, फक्त वर्षभरात चुकता केला ‘त्यांचा’ हिशोब! ; सावंतवाडीत ताकद भाजपाचीच होती!, विशाल परब यांनी नगरपालिका निकालातून केले सिद्ध!

– किंगमेकर रवींद्र चव्हाण आणि विशाल परब -सौ वेदिका परब अशा शेकडो कटआउट्सनी झळाळून उठले निवडणुक निकालाचे मैदान!

सावंतवाडी : आजपासून बरोब्बर एक वर्षापूर्वीचा काळ. सावंतवाडी विधानसभेची जागा भारतीय जनता पार्टीला सोडावी म्हणून पूर्ण सिंधुदुर्ग भाजपा आक्रमक मोडला गेली होती. दीपक केसरकर यांना यावेळी जागा सोडल्यास आपण प्रचार करणार नाही असा निर्णय प्रमुख भाजपा पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन केला होता. मात्र पक्षाने वरिष्ठ स्तरावर महायुतीचा निर्णय जाहीर करत कार्यकर्त्यांना हिंदुत्वाच्या मुद्द्यासाठी एकत्र काम करायला लावले. याचा फायदा होत दीपक केसरकर पुन्हा आमदार झाले मात्र यानंतर “ताकद कोणाची” हा वाद वाढतच गेला.

शेवटी तर तो विकोपाला जात एकमेकांचे पदाधिकारी फोडण्यात त्याची परीणती झाली. आमदार दीपक केसरकर यांनीही ताकद शिवसेनेचीच हा राग आळवला आणि भाजपा कार्यकर्ते नाराज झाले. ही नाराजी दुर करण्यासाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी अपक्ष उमेदवारी लढवलेल्या विशाल परब यांचे निलंबन रद्द करत त्यांची पक्षात घरवापसी करून घेतली. युवा नेते विशाल परब यांच्यावर विश्वास ठेवला आणि आज… सावंतवाडी नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने विशाल परब यांनी माननीय रविंद्र चव्हाण यांनी दाखवलेल्या विश्वासाला खरे उतरत न्याय दिला आहे. महायुतीशिवाय लढलेल्या मैत्रीपूर्ण लढतीत त्यावेळी दीपक केसरकर यांच्या विजयामागची ताकद भाजपाचीच होती हे आजच्या निकालाने स्पष्ट झाले आहे. यावेळी विजयाचा जल्लोष करणाऱ्या हजारो कार्यकर्त्यांनी या विजयाचे किंगमेकर असा उल्लेख करणारे असंख्य कटआउट झळकवत या विजयाचे श्रेय भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि युवा नेते विशाल परब यांना दिले असल्याचे यावेळी दिसून आले. निकालाच्या ठिकाणी शेकडोच्या संख्येने दिसत असलेले किंगमेकर रविंद्र चव्हाण आणि श्री विशाल परब व सौ वेदिका परब यांचा उल्लेख करणारे कटआऊटस व बॅनर आज निवडणुक निर्णय मैदानातले खास आकर्षण ठरले.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles