सावंतवाडी : येथील नगराध्यक्ष पदी भाजपच्या उमेदवार श्रद्धाराजे भोंसले यांनी दमदार विजय संपादन केला आहे. या ठिकाणी शिवसेनेच्या ॲड.नीता सावंत-कवीटकर, ठाकरे शिवसेनेच्या सीमा मठकर, काँग्रेसच्या साक्षी वंजारी यांसह अपक्ष उमेदवार अन्नपूर्णा कोरगावकर यांना पराभव सहन करावा लागला आहे. दरम्यान माझ्या यशात भारतीय जनता पार्टीचे तमाम वरिष्ठ नेते आणि स्थानिक पदाधिकारी यांनी मौलिक भूमिका बजावले असल्यामुळे माझा विजय सुपर झाला असल्याची प्रतिक्रिया श्रद्धाराजे यांनी दिली आहे.



