Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

बूम…बूम… बुमराहाचा चेन्नईमध्ये जलवा, ४०० बळींचा टप्पा पूर्ण करत इतिहास रचला.! ; हरभजन सिंगचा मोडला विक्रम.

चेन्नई : भारत आणि बांगलादेश यांच्यात पहिली कसोटी चेन्नईमध्ये चेपॉकवर सुरु आहे. या कसोटीत भारताच्या गोलंदाजांनी पहिल्या डावात बांगलादेशच्या संघाला 149 धावांवर रोखलं. जसप्रीत बुमराह यानं बांगलादेशच्या चार विकेट घेतल्या. बुमराहनं आज चारशे आंतरराष्ट्रीय विकेटचा टप्पा पूर्ण केला. 400 आंतरराष्ट्रीय विकेट घेणारा तो दहावा गोलंदाज ठरला आहे. बुमराहनं आज भारताचा फिरकीपटू हरभजन सिंगचा एक रेकॉर्ड मोडला आहे.

जसप्रीत बुमराहनं भारतासाठी आतापर्यंत 196 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यामध्ये यामध्ये 227 डावांमध्ये जसप्रीत बुमराहनं 400 विकेटचा टप्पा पूर्ण केला आहे. जसप्रीत बुमराहची 19 धावांमध्ये 6 विकेट ही सर्वोत्तम कामगिरी आहे. जसप्रीत बुमराहनं बागंलादेश विरुद्ध देखील दमदार गोलंदाजी केली आहे.

बुमराहनं मोडलं हरभजन सिंगचं रेकॉर्ड –

जसप्रीत बुमराहनं हरभजन सिंगचं एक रेकॉर्ड मोडलं आहे. बुमराहनं 227 डावांमध्ये 400 विकेट घेतल्या आहेत. तर, हरभजन सिंगला ही कामगिरी करण्यासाठी 237 डावांमध्ये गोलंदाजी करावी लागली. आर. अश्विननं 216 डावांमध्ये 400 विकेट घेतल्या होत्या. कपिल देवनं 220 डावांमध्ये 400 विकेटचा टप्पा पूर्ण केला होता.

जसप्रीत बुमराह सहाव्या स्थानावर –

टीम इंडियाकडून सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांच्या यादीत जसप्रीत बुमराह सहाव्या स्थानावर आहे. कपिल देव या यादीत पहिल्या स्थानावर आहे. कपिल देवनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी 687 विकेट घेतल्या. तर, झहीर खाननं 610 विकेट घेतल्या आहेत. जवागल श्रीनाथ तिसऱ्या स्थानावर असून त्यानं 551 विकेट घेतल्या आहेत.

बुमराहची बागंलादेश विरुद्ध दमदार कामगिरी –

जसप्रीत बुमराहने चेन्नईत बागंलादेश विरूद्धच्या कसोटी सामन्यात दमदार कामगिरी केली आहे. जसप्रीत बुमराहनं बांगलादेशच्या चार विकेट घेतल्या. शदमन इस्लाम, तस्कीन महमूद, मुशफिकुर रहीम आणि हसन महमूदला बुमराहनं बाद केलं.

भारताचं दोन्ही दिवसांवर वर्चस्व –

भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटीच्या दोन्ही दिवशी गोलंदाजांचं वर्चस्व राहिल्याचं पाहायला मिळालं. मात्र, दोन्ही दिवसांचा विचार केला असता भारताचं वर्चस्व राहिल्याचं पाहायला मिळतं. भारताकडून आर. अश्विन, यशस्वी जयस्वाल,  रवींद्र जडेजा, रिषभ पंत यांनी दमदार कामगिरी केली. या चार फलंदाजांच्या जोरावर भारतानं पहिल्या डावात 376 धावा केल्या. तर, भारताचे इतर दिग्गज फलंदाज अपयशी ठरले. भारताच्या जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, आकाशदीप आणि रवींद्र जडेजा यांनी दमदार गोलंदाजी करत बांगलादेशला 149 धावांवर रोखलं.

ADVT –

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles