Wednesday, December 24, 2025

Buy now

spot_img

वैभववाडी महाविद्यालयाचे सात दिवसीय रासेयो निवासी श्रमसंस्कार शिबीर उत्साहात संपन्न.

वैभववाडी : वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था, मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाचा नावळे (ता. वैभववाडी) येथे आयोजित सात दिवसीय निवासी श्रमसंस्कार शिबिराचा समारोप समारंभ स्थानिक समिती अध्यक्ष श्री. सज्जनकाका रावराणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
यावेळी व्यासपीठावर श्री. शरदचंद्र रावराणे (विश्वस्त, महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था), मा. कु. सोनल गुरव (सरपंच, नावळे), उपसरपंच व महाविद्यालयाचे अधीक्षक श्री. संजय रावराणे, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. नामदेव गवळी,उपप्राचार्य डॉ. मारुती कुंभार, संतोष भरडकर (मुख्याध्यापक, नावळे शाळा),
श्रीम. स्नेहा शेळके (पोलीस पाटील, नावळे), डॉ. माणिक चौगुले (NSS क्षेत्र समन्वयक) NSS स्वयंसेवक व नावळे गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी स्वच्छता अभियान, श्रमदान, आरोग्य व सामाजिक जनजागृती उपक्रमांमुळे ग्रामीण जीवनाची प्रत्यक्ष ओळख झाल्याची भावना स्वयंसेवकांनी आपल्या मनोगतात व्यक्त केली. अध्यक्षीय भाषणात श्री. सज्जन काका रावराणे यांनी NSS मुळे विद्यार्थ्यांमध्ये सेवाभाव, सामाजिक जाणीव व नेतृत्वगुण विकसित होतात. विध्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून अधिकारी होण्याची स्वप्ने पाहावी असे आवाहन केले. प्रमुख उपस्थित मान्यवरांनी NSS स्वयंसेवकांच्या कार्याचे कौतुक करून पुढील आयुष्यातही समाजसेवेची भावना जोपासण्याचे आवाहन केले.
नावळे गावातील ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे हे NSS शिबीर यशस्वीपणे पार पडले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ. विजय  पैठणे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. सत्यजित राजे यांनी मानले. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन प्रा.सतीश करपे यांनी केले.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles