Wednesday, December 24, 2025

Buy now

spot_img

जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत रोहिणी सोमले, प्रतिक्षा गावडे, निता सावंत अव्वल! ; राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आयोजित ग्राहक पंचायत महाराष्ट्र सिंधुदुर्ग जिल्हा शाखेचे आयोजन.

वैभववाडी : २४ डिसेंबर या राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त ग्राहक पंचायत महाराष्ट्र-कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हा शाखा आयोजित जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा-२०२५ मध्ये कनिष्ठ महाविद्यालय गटात कु. रोहिणी सोमले, महाविद्यालय गटात कु. प्रतिक्षा गावडे तर खुल्या गटात श्रीम. निता सावंत यांनी प्रथम क्रमांक मिळवला आहे.

२४ डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त सदर स्पर्धा ग्राहक साक्षरता या उद्देशाने तीन गटात आयोजित करण्यात आली होती. या निबंध स्पर्धेत ३९ स्पर्धकांनी भाग घेतला होता.

या स्पर्धेचा गटानिहाय निकाल पुढीलप्रमाणे.
कनिष्ठ महाविद्यालय गट –
(विषय– विद्यार्थी ग्राहक- हक्क, अधिकार आणि कर्तव्ये)
प्रथम – कु. रोहिणी नामदेव सोमले–( कनिष्ठ महाविद्यालय कासार्डे, ता.कणकवली)
द्वितीय– कु. गौरी ज्ञानेश्वर राणे-(कै. सौ.सिताबाई पाटील कनिष्ठ महाविद्यालय पाट, ता. कुडाळ)
तृतीय– कु. पुष्कर प्रमोद इलावडेकर-( कै.हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालय, वैभववाडी)

महाविद्यालय गट –
(विषय– ग्राहक शिक्षण-शाळा, महाविद्यालयातून समाजापर्यंत)
प्रथम– कु. प्रतिक्षा भक्तप्रल्हाद गावडे-(श्री.स.ह.केळकर महाविद्यालय, देवगड)
द्वितीय– कु. साहिल रघुनाथ कासार-(बॅ.नाथ पै.महाविद्यालय, कुडाळ)
तृतीय– कु. प्रगती राजेंद्र तावडे-
(आनंदीबाई रावराणे महाविद्यालय वैभववाडी)

खुला गट(विषय- डिजिटल युगातील ग्राहक फसवणूक-जागरुकतेची गरज)
प्रथम-  श्रीम. निता नितीन सावंत- सावंतवाडी.
द्वितीय- कु.तेजश्री संजय पाटील- कासार्डे, ता. कणकवली.
तृतीय- श्रीम.अनुजा प्रवीण कदम, कणकवली.

सर्व विजेत्या आज स्पर्धकांना बुधवार दि. २४ डिसेंबर, २०२५ रोजी सकाळी ठिक १०.३० वा. श्रीम. तृप्ती धोडमिसे-जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्या अध्यक्षतेखाली आणि श्री.मोहन दहीकर-जिल्हा पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग, श्री. रवींद्र खेबुडकर- मुख्य कार्यकारी अधिकारी सिंधुदुर्ग, श्रीम. शुभांगी साठे, अपर जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग व श्रीम. इंदुमती मालुष्टे- अध्यक्ष, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग सिंधुदुर्ग यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा नियोजन सभागृह, जिल्हा मुख्यालय ओरोस सिंधुदुर्गनगरी येथे आयोजित जिल्हास्तरीय राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. तरी सर्व विजयी स्पर्धकांनी या कार्यक्रमाला वेळेत उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या सिंधुदुर्ग जिल्हा शाखेने केले आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles