सावंतवाडी : वैशिष्ट्यपूर्ण निधीमधून शहरात मोक्याच्या ठिकाणी ५ स्ट्रीट लाईट डेकोरेटीव्ह पोल बसवण्याचे काम पुर्णत्वास आले असून माजी मंत्री, आमदार दीपक यांच्या माध्यमातून व नगरसेवक देव्या सुर्याजींच्या पाठपुराव्याने हे काम पुर्णत्वास आले आहे.
गेली बरीच वर्षे शाळा नं २ च्या बाजूला संरक्षक भिंत कोसळुन रस्ता अरुंद झाला होता. विद्यार्थी आणि नागरिक यांना येताना जाताना धोकादायक बनला होता. यावर युवा रक्तदाता संघटना अध्यक्ष देव्या सूर्याजी यांनी नगरपालिका प्रशासन यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले होते. आजपासून या कामाला सुरुवात झाली असून ५ नवीन स्ट्रीट लाईट डेकोरेटीव्ह पोल लाईट बसवण्याचे कामही पुर्ण झाले. यामुळे या परिसरात झगमगाट पसरला असून याबद्दल नगरपालिका विद्युत विभाग कर्मचारी प्रदीप सावरवाडकर, दीपक म्हापसेकर, कंत्राटदार विजय सावंत यांचे नगरसेवक श्री. सूर्याजी यांनी आभार मानलेत.


