सावंतवाडी : भाषेच्या पातळीवर सर्व भाषा समान असल्या तरी प्रत्येक भाषेचं स्वतःचे स्वतंत्र महत्त्व, सौंदर्य आणि सामर्थ्य आहे. त्यानुसार आपली राष्ट्रभाषा हिंदी भाषेचे आहे. आपण महाराष्ट्रात मराठी बोलतो महाराष्ट्राबाहेर देशात आपल्याला हिंदी भाषेशिवाय पर्याय नाही, हे सत्य आहे. इतकेच नाही, तर आपल्या भारतीय देशातील लोक जेव्हा वेगवेगळ्या देशांत भेटतात तेव्हा देखील आपण हिंदीमध्येच बोलतो. तेव्हा ते आपलं बोलणं अथवा संवाद साधने नैसर्गिक वाटते आणि हाच नैसर्गिकपणा हिंदी भाषेची गरज, महत्त्व, सौंदर्य आणि गोडव्याची अनुभूती देत असतो, असे मत उपप्राचार्य डॉ. सुमेधा नाईक यांनी येथे व्यक्त केले. शहरातील राणी पार्वतीदेवी ज्युनिअर कॉलेज येथे हिंदी भाषा दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात उपप्राचार्य डॉ. सुमेधा नाईक बोलत होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात हिंदी विषयाच्या प्रा. डॉ. संजना ओटवणेकर यांच्या प्रास्ताविकपर भाषणाने झाली. यावेळी व्यासपीठावरील मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच हिंदी विषय दिनाचे औचित्य साधून प्रशालेचे मुख्याध्यापक जगदीश धोंड यांनी हिंदी राष्ट्रभाषा असून हिंदीचे संवर्धन झाले पाहिजे, असे सांगत हिंदी भाषा दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. ज्येष्ठ प्रा. दशरथ राजगोळकर यांनी हिंदी भाषेच्या दिनानिमित्त “जिंदगी एक किताब है, न जानें इसमें कितने पन्ने है?, हर पन्ने पर कुछ ना कुछ लिखा है, लेकिन आखरी पन्नेपर मौत लिखी है.!”, अशा शेरोशायरीच्या माध्यमातून उपस्थितीत श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून हिंदी भाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

त्यासोबत प्रा. संतोष पाथरवट यांनी स्वरचित ‘समय की कीमत’ या हिंदी कवितेचे अप्रतिम वाचन करून हिंदी भाषा ही किती श्रवणीय अल्लादायक आहे. हे सांगून हिंदी भाषा दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रमात कॉलेजच्या विद्यार्थ्यांमधून हिंदी भाषेचे थोरवी व कौतुक कु. स्वरांगी खानोलकर हिने आपल्या भरतनाट्यम् नृत्याविष्काराद्वारे वेगवेगळ्या हावभाव आणि मुद्रांच्या माध्यमातून दाखवून दिले. तर छायावादी कवी म्हणून हिंदी साहित्यात परिचित असलेले हरिवंशराय बच्चन यांची कविता ‘सुना है चेहरे पर किताबों से ज्यादा लिखा है!’ या कवितेचे वाचन करून कु. कनिष्का सम्राट व तेजल परब ने उपस्थितांचे मने जिंकले.
यावेळी समूहगीत, काव्यवाचन, नाटिका इत्यादी विषयावरती हिंदी भाषेतून श्रावणी सावंत सिया कवठणकर, पूजा कोकरे, वैभवी सावंत, शुभम शिरोडकर, कोमल जबडे, सुवर्णा मेस्त्री आदी विद्यार्थ्यांनी कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन कार्यक्रमाची रंगत वाढवली. या कार्यक्रमाला कॉलेजचा जी.एस. कु. युवराज बोरजिया व एल.आर कु. पूजा राठोड सहित सांस्कृतिक कमिटी प्रमुख प्रा. विनिता घोरपडे, प्रसिद्धी कमिटी प्रमुख प्रा. रणजीत राऊळ, प्रा. सविता कांबळे, प्रा. डॉ. अजेय कामत, प्रा. पवन वनवे, प्रा. दशरथ सांगळे, प्रा. वामन ठाकूर, प्रा. महाश्वेता कुबल, प्रा. स्मिता खानोलकर, प्रा. स्पृहा टोपले, प्रा. माया नाईक, प्रा. जोसेफ डिसिल्वा, प्रा. राहुल कदम, प्रा. विजय सावंत, प्रा. निलेश कळगुंठकर, प्रा. दिपा मोरजकर, प्रा. पूनम वाडकर आदि प्राध्यापक वर्ग व मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षा जाधव यांनी केले शेवटी चित्रलेखा सावंत यांनी केले यांनी आभार मानले.
ADVT –




