सावंतवाडी : ‘भ्रष्ट अनितीला करा लक्ष, न्याय हक्कासाठी व्हा दक्ष.!‘ या टॅग लाईनखाली संपूर्ण महाराष्ट्र राज्यात कार्यरत असणाऱ्या स्वाभिमानी मराठी पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य संघटनेचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण व वर्धापन दिन सोहळा रविवार, दिनांक ६ ऑक्टोबर 2024 रोजी धुळे महानगरीत होत आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री नामदार दीपक केसरकर असणार आहेत. आज मंत्री दीपक केसरकर यांना स्वाभिमानी मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष रामकृष्ण नेरकर तसेच प्रदेश अध्यक्ष किरण बागुल यांच्या सूचनेनुसार कोकण विभाग अध्यक्ष प्रा. रुपेश पाटील व सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष जय भोसले यांनी मंत्री दीपक केसरकर यांना सदर राज्यस्तरीय पुरस्कार वितरण व वर्धापन दिन सोहळ्याचे निमंत्रण दिले. यावेळी खूप छान कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल स्वाभिमानी मराठी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याचे अभिनंदन करत मंत्री दीपक केसरकर यांनी आपण सदर सोहळ्याला उपस्थित राहून उद्घाटक म्हणून आपण नक्कीच उपस्थित राहू, अशी ग्वाही कोकण प्रदेशाध्यक्ष प्रा. रुपेश पाटील व सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष जय भोसले यांना दिली.
दरम्यान या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात सामाजिक, शैक्षणिक, साहित्य, आरोग्य, पत्रकारिता, सांस्कृतिक, क्रीडा, उद्योजक, वैद्यकीय, प्रशासन व प्रभावशाली राजकीय व्यक्तिमत्व (युवा) यांना गौरविण्यात येणार असून स्वाभिमानी मराठी पत्रकार संघाच्या वतीने दिनांक 6 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी साडेदहा वाजता दाते रीजेन्सी, रेल्वे क्रॉसिंग जवळ, मालेगाव रोड, धुळे येथे हा दिमाखदार सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष रामकृष्ण नेरकर तसेच प्रदेश अध्यक्ष किरण बागुल यांनी दिली आहे.
ADVT –