सावंतवाडी : येथील मिलाग्रीस हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी नुकत्याच पार पडलेल्या शालेय जिल्हास्तरीय रोल बॉल चॅम्पियनशिपमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
या स्पर्धेत १४ वर्षांखालील आणि १७ वर्षांखालील मुलींच्या संघाने स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे.
यातील विशेष बाब म्हणजे प्रथम क्रमांक पटकावलेल्या दोन्ही मुलींच्या संघांची (१४ व १७ वर्षांखालील) आगामी विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, त्यांच्या मार्गदर्शकांचे आणि प्रशिक्षकांचे शाळेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालढाणा तसेच मिलाग्रीसच्या सर्व कर्मचारी वर्ग, पाळकवर्ग यांच्याकडून हार्दिक अभिनंदन करण्यात आले असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.



