पर्वरी (गोवा) : येथे ३ ते ९ ऑक्टोबर दरम्यान संगीतमय श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे. पर्वरी – गोवा येथील आझाद भवन, न्यू मॅजेस्टिक समोर ३ ते ९ ऑक्टोबर दरम्यान दररोज संध्याकाळी ठीक ५ ते ८ वाजेपर्यंत सर्व भाविक भक्तांना संगीतमय श्रीमद् भागवत कथा ऐकावयास मिळणार असून या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आयोजकांनी कळविले आहे. हेल्पफुल ऑर्गनायझेशन फॉर लाईक माइंडेड इंडियन्स (होली) व भारत तिबेट संयोग मंच, गोवा यांनी सदर कथेचे आयोजन केले असून मुख्य कार्यकारिणी प्रणेते केंद्रीय मंत्री श्रीपादभाऊ नाईक, अध्यक्ष के. के. चतुर्वेदी, उपाध्यक्ष जे. के सिंग, भवरलाल सुतार, महासचिव सुरज नाईक, खजिनदार निशा पांडये, सचिव सरोज राय, सहसचिव बी. एम. यादव, मार्गदर्शक डॉ. गोविंद काळे, संजीव गडकर (IAS), डॉ. दयानंद राव, नरेंद्र मोहन ओझा, लालजी पागी, गजेंद्रसिंह राजपुरोहित, डॉ. मार्कंडेय तिवारी आदींनी भाविक – भक्तांनी या संगीतमय श्रीमद् भागवत कथेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
गोव्यात ३ ते ९ ऑक्टोबर दरम्यान संगीतमय श्रीमद् भागवत कथेचे आयोजन.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


