Monday, November 10, 2025

Buy now

spot_img

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल केंद्रीय मंत्रिमंडळाचे स्वागत.! ; कोमसाप तर्फे अभिनंदन ठराव.!

सावंतवाडी : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करून दिल्याबद्दल केंद्रीय मंत्रिमंडळाचे स्वागत कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेच्या वतीने आज करण्यात आले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा या कोकण मराठी साहित्य परिषद, महाराष्ट्रातील साहित्यिक आणि मराठी भाषा प्रेमींच्या कित्येक वर्षाच्या मागणीला आज खऱ्या अर्थाने यश मिळाले. कोकण मराठी साहित्य परिषद शाखा सावंतवाडीच्या आज झालेल्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्रिमंडळ, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्या अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला. या विशेष कार्याबद्दल शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन कार्यकारणीच्या वतीने अभिनंदन करण्याचे यावेळी ठरविण्यात आले. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला असून त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेच्या कार्यकारणीची बैठक सावंतवाडी पर्णकुटी विश्रामगृह येथे आज सायंकाळी संस्थेचे अध्यक्ष ॲड. संतोष सावंत यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे, सचिव प्रा. सौ. प्रतिभा चव्हाण, सहसचिव राजू तावडे, खजिनदार डॉ. दीपक तुपकर, केंद्रीय कार्यकारणी सदस्य सौ. उषा परब, जिल्हा कार्यकारिणीचे कोषाध्यक्ष भरत गावडे, ॲड. अरुण पणदूरकर, ॲड. नकुळ पार्सेकर, दीपक पटेकर, सौ. प्रज्ञा मातोंडकर, सौ. ऋतुजा सावंत भोसले, सौ. मंगल नाईक उपस्थित होते. यावेळी दि. 13 ऑक्टोबर रोजी सावंतवाडी येथे वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्याचे निश्चित करण्यात आले. वेगवेगळ्या क्षेत्रात विशेष प्राविण्य प्राप्त केलेल्या सदस्यांचा गुणगौरव वार्षिक सर्वसाधारण सभेत करण्याचे ठरले. यावेळी वर्षभरात संस्थेने केलेल्या कार्याचा आढावा घेण्यात आला.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles