स्वाभिमानी मराठी पत्रकार संघाचा वर्धापन दिन सोहळा उद्या रंगणार.! ; विविध क्षेत्रातील गुणवंतांचा मान्यवरांच्या हस्ते राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मान होणार.!

धुळे : स्वाभिमानी मराठी पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य यांच्या तेराव्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंतांचा सन्मान सोहळा उद्या रविवार, दिनांक ६ ऑक्टोबर रोजी दाते रिजेन्सी, रेल्वे क्रॉसिंग जवळ, मालेगाव रोड, धुळे येथे आयोजित केला आहे. सामाजिक, शैक्षणिक, साहित्य, आरोग्य, पत्रकारिता, सांस्कृतिक, क्रीडा, उद्योजक, वैद्यकीय, प्रभावशाली राजकीय युवा व्यक्तिमत्व आणि प्रशासन आदी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान देणाऱ्या गुणवंतांचा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन स्वाभिमानी मराठी पत्रकार संघाच्या वतीने गौरव केला जाणार आहे. या समारंभाचे उद्घाटक म्हणून राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर असून पुरस्कार वितरण मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते होणार आहे. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी खासदार डॉ. शोभाताई बच्छाव व विशेष सत्कारमूर्ती आमदार कुणाल बाबा पाटील तसेच धुळे शहराचे आमदार डॉ. फारूक शाह, नंदुरबारचे खासदार गोवाल पाडवी, आमदार मंजुळा गावित, आमदार अमरीश पटेल, जिल्हा परिषद अध्यक्षा धरती देवरे, जिल्हा परिषद सभापती हर्षवर्धन दहिते, युवा नेते राम भदाणे, उद्योजक बाळासाहेब भदाणे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

तरी या वर्धापन दिन व पुरस्कार वितरण सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक संस्थापक अध्यक्ष रामकृष्ण नेरकर, प्रदेशाध्यक्ष किरण बागुल, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष बंडू नाना गांगुर्डे, कोकण प्रदेशाध्यक्ष प्रा. रुपेश पाटील, धुळे जिल्हाध्यक्ष विनोद रोकडे, सहसंघटक संतोष मिस्तरी, महाराष्ट्र राज्याचे संघटक विनायक अहिरे, मुंबई अध्यक्ष महेश सावंत, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्रीकांत दारोळे, माजी प्रदेशाध्यक्ष संजय चव्हाण, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष जय भोसले, पश्चिम महाराष्ट्र सचिव इकबाल मुल्ला, कोषाध्यक्ष दिनेश निकुंभ यांसह सर्व पदाधिकारी व संस्थेच्या शिलेदारांनी केले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles