मालवण : क्रीडा व युवा संचलनालय,पुणे आणि जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग आयोजित दिनांक 07 व 08 ऑक्टोंबर 2024 रोजी त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे या ठिकाणी संपन्न झालेल्या मालवण तालुका 19 वर्षाखालील शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाने जोरदार यश संपादन केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ.शिवराम ठाकूर यांनी गुलाबपुष्प देऊन सत्कार केला. यावेळी वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक वर्ग उपस्थित होते.
यशसंपन्न मुलींमध्ये 1) नजमुन्नीसा शाहनवाज शेख 100मी धावणे प्रथम क्रमांक,लांब उडी द्वितीय क्रमांक,100मी हर्डल्स तृतीय क्रमांक, 2) दीक्षा देऊ झोरे 800मी प्रथम क्रमांक, 3) प्राजक्ता सत्यवान सावंत 3 किमी चालणे प्रथम क्रमांक, 4) आर्या शंकर किडये100मी धावणे तृतीय क्रमांक पटकावला तर मुलांमध्ये 1) लक्ष्मण सुर्वे तिहेरी उडी प्रथम 800मी धावणे द्वितीय क्रमांक 2) पारस मानवर 3000मी प्रथम क्रमांक, 400 मी हर्डल प्रथम क्रमांक 3) मयुरेश बागवे 1500मी धावणे प्रथम क्रमांक 4) संदेश शिर्के 1500 मी धावणे द्वितीय क्रमांक 5) विराज राणे गोळाफेक प्रथम क्रमांक, हातोडा फेक द्वितीय क्रमांक 6) निशांत शिरोडकर हातोडा फेक प्रथम क्रमांक7) सार्थक आचरेकर 110 मी हर्डल प्रथम क्रमांक, 5 किमी तृतीय क्रमांक 8) 4×100 मी. रिले तृतीय क्रमांक पारस मानवर,शुभम खिलारे, संदेश शिर्के,निशान शिरोडकर यांनी प्राप्त केले. यशस्वी प्रथम दोन क्रमांकावर असणाऱ्या विद्यार्थ्यांची जिल्हा स्तरावर निवड झाली आहे ते मालवण तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
यावेळी कनिष्ठ व वरीष्ठ महाविद्यालय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,कृ.सी.देसाई शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष श्री.बाळासाहेब पंतवालावलकर, सचिव चंद्रशेखर कुशे व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. साईनाथ चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या असून सदर विद्यार्थ्यांना क्रीडा मार्गदर्शक प्रा.हसन खान यांचे मार्गदर्शन लाभले.


