मुंबई : पत्रकारांसाठी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केला.डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रच्या पदाधिकारी व सदस्यांच्या पाठपुराव्याला यश मिळाल्याची भावना संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी व्यक्त केली आहे.
संघटनेच्या भिलार-महाबळेश्वर ऐतिहासिक अधिवेशनाचे उद्घाटन करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला तसेच कनेरीमठ-कोल्हापूर अधिवेशनाच्या समारोप प्रसंगी बोलताना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिलेला शब्द पाळल्यास बद्दल राज्यभरातील पत्रकारांत आनंद व्यक्त होत आहे.
डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे पदाधिकारी व सदस्य राज्यातील पत्रकारांच्या विविध मागण्यासाठी सतत पाठपुरावा करीत होते.राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष प्रमुख व मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी, मुख्यमंत्र्यांचे माध्यम सल्लागार विनायक पात्रुडकर यांनी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे सातत्याने पत्रकारांची बाजू मांडली.
पत्रकार महामंडळाची मुख्यमंत्र्यांची घोषणा, डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या पाठपुराव्याला यश.! : राजा माने. ; मुख्यमंत्री व अजितदादांनी महाबळेश्वर, कोल्हापूर अधिवेशनात दिलेला शब्द पाळला, एकनाथ शिंदें, देवेंद्र फडणवीस, अजितदादांचे मानले आभार.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


