मुंबई : अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची शनिवारी रात्री मुंबईतील वांद्रे परिसरात गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या घटनेमुळे मुंबईत एकच खळबळ उडाली होती. वांद्रे परिसरातील खेरवाडी जंक्शनच्या सिग्नलजवळ बाबा सिद्दिकी यांचे पुत्र झिशान सिद्दिकी यांचे कार्यालय आहे. याच परिसरात बाबा सिद्दिकी यांच्यावर तिघांनी गोळीबार केला. प्राथमिक माहितीनुसार, या तिघांनी बाबा सिद्दिकी यांच्यावर सहा राऊंड फायर केले. यापैकी तीन गोळ्या बाबा सिद्दिकी यांच्या छातीत आणि डोक्याजवळ लागल्या. यामध्ये ते गंभीररित्या जखमी झाले होते. त्यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान बाबा सिद्दिकी यांचा मृत्यू झाला. यानंतर लिलावती रुग्णालयाबाहेर बाबा सिद्दिकी यांच्या समर्थकांनी प्रचंड मोठी गर्दी केली आहे.
बाबा सिद्दिकींना १५ दिवसांपूर्वी धमकी, वाय दर्जाची सुरक्षाही दिली, पण घात झालाच.!
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


