सावंतवाडी : निवडणुका जवळ आल्या की, उमेदवार मोक्याच्या ठिकाणी आपण काय करू शकतो?, याबाबत चर्चा होण्याकरिता बॅनर लावतात. जणू या आधी निवडणुकीत उजव्या, डाव्या बाजूने पराभव होऊन सुद्धा त्या वेळेस मला निवडून आणले नाही. यामुळे मतदार संघातील विकासाची कामं झाली नाहीत, असं दर्शविणारी ती बॅनरवर लिहिलेली शब्द रचना असते. जो तो सोई-सुविधांनी उपयुक्त मोफत योजनायुक्त हॉस्पिटल देतो, असं काहीसं चित्र त्यात रेखटतो. पण प्रत्यक्षात मात्र या आधीच्या निवडणुकीतील प्रचार फेरी सभेंमधील घडवून आणलेल्या आणि गावप्रमुखाच्या आग्रहाखातर देवळात बसून ग्रामस्थांनी मागणी केलेल्या सभांमधील ते मुद्दे मात्र हे उमेदवार आठवणीत असून सुद्धा विसरल्यासारखे करून दाखवतात. बिचारा तो गावप्रमुख मात्र गावातील ग्रामस्थांच्या तोंडघशी पडतो. देवळाच्या पत्र्याच्या शेडची आश्वासनेसुद्धा पूर्ण न करता देवाला फसवणाऱ्या खादीने आता जर गावप्रमुखाच्या मदतीने मतदारसंघात सभा आयोजित करायच्या असतील तर तुम्ही प्रत्यक्षात विकसित करणाऱ्या प्रलंबित कामांची यादी आपल्या प्रतिज्ञा पत्रकाद्वारे जाहीर करावी, असा रोखठोक सवाल सामाजिक कार्यकर्ते अमित वेंगुर्लेकर यांनी केला आहे.
श्री. वेंगुर्लेकर पुढे म्हणतात, आता जनतेनं ठरवावं की, गावप्रमुख जेव्हा सभेसाठी आमंत्रण देईल, तेव्हा त्या उमेदवाराकडून तोंडी आश्वासन न घेता आपल्या मतदार संघातील विकासाची यादी प्रतिज्ञा पत्रकाद्वारे जाहीर सभेत मागणी करा. कारण फक्त निवडणुकीच्या प्रचारात हे उमेदवार जनतेसमोर हळवे होतात. मात्र एकदा निकाल लागला की विजयी उमेदवाराचा मंत्रिमंडळात समावेश झालेला असतो ते फक्त उद्घाटनाच्या वेळेसच भेट देऊन पाहणी करण्यासाठी आणि निवेदने सवकरण्यासाठी येतात आणि पराभूत झालेले ते महान नेते मात्र प्रामाणिक राहून काय मिळालं जर निवडून आणले असते तर ? पुन्हा पहिल्यापासून तीच कॅसेट सुरू करतो. कारण आता त्यांची घाईगडबडीने बोलायची संधी पुढील पाच वर्षांत येईल न येईल?, हे त्यांना माहित असतं. मग काय कोणाला विचारायचं? पण मात्र एक बदल घडलेला असतो. पराभूत भाईंची नवीन कोरी कार मात्र जनतेला एक संदेश देणारी ठरते, ते म्हणजे “माझं काही नुकसान नाही, आता तुमचं तुम्ही बघा.!” पण जाता – जाता गावप्रमुखाला मात्र दिलेल्या खर्चाच्या कागदांचा हिशोब करुन घेतो. ही प्रक्रिया आता कुठेतरी बदलली पाहिजे. कारण आताचे जाहीर होणारे सर्व उमेदवार हे सुसंस्कृत आणि यापूर्वी आपापल्या मतदार संघात पुनरागमन करणारे आहेत.
कृपया या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माननीय उमेदवारांनी कृपया जनतेच्या हितासाठी कित्येक वर्षे प्रतिक्षेत असलेलं सर्वसुख सोईनी उपयुक्त असे रुग्णालय प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून प्रलंबित ठेवलेला हा प्रश्न मार्गी लावा. एस. टी. महामंडळ, पोलीस खाते व शासकीय आरोग्य सेवा यांच्या प्रलबित मागण्या पूर्ण करा.!, सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम मिळण्यासाठी प्रयत्न करा, सरकारी योजनांचा पुरेपूर वापर करून गोरगरीब जनतेसाठी आर्थिक बँकांना नियमात राहून सहकार्य करण्याकरिता पाठपुरावा करून आपापल्या मतदार संघात सर्वांगीण विकास प्रगती पथावर घेऊन चला, पुढील काळात आपल्याला पक्षाचं तिकीट घरपोच मिळवून देण्याची आणि पक्ष बदल झाला तरी वारंवार निवडून आणण्याची जबाबदारी जनतेची असेल. ही आपणास मानवाधिकार न्याय सुरक्षा संगठनतर्फे नम्र विनंती आहे, असे मानवाधिकार न्याय सुरक्षा संगठनतर्फे प्रदेश सचिव अमित वेंगुर्लेकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.


