वेंगुर्ला: शिरोडा – वेळागर येथे ताज प्रकल्प भूमीपूजन वेळी झालेला प्रकार व ग्रामस्थांचा उद्रेक शालेय शिक्षण मंत्री व सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांना धडकी भरवणारा आहे. स्थानिक ग्रामस्थाना विश्वासात न घेता केसरकरांनी या प्रकल्पाचे भूमीपूजन केल्यानेच त्यांना लोकांच्या रोषाला सामोर जावे लागले, पुन्हा असा प्रयत्न केल्यास या पुढचे काही तरी वेगळे करावे लागेल, असा इशारा वेळागर ग्रामस्थ स्थानिक भूमिपुत्र सामाजिक कार्यकर्ते आबा चिपकर यांनी दिला आहे.
शिरोडा वेळागर ताज प्रकल्प भूमीपूजन कार्यक्रम रविवारी आयोजित केला होता. त्याला ग्रामस्थानी जोरदार विरोध करत पर्यटन मंत्री व शिक्षण मंत्री यांच्या गाड्या अडवल्या. हा झालेला विरोध म्हणजे या मतदारसंघातील आमदार व राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची नाचक्की करणारा होता. अक्षरशः आम्ही वेळागरवासीयांनी दीपक केसरकर यांना हाकलवून लावले. स्थानिक भूमिपुत्रांवर होत असलेला अन्याय वारंवार केसरकर यांच्या कानावर घालून देखील त्यांनी दुर्लक्ष करत फक्त स्वतःच्या अट्टाहासापाई हा प्रकल्प रेटन्याचा प्रयत्न केला भूमिपूजनला विरोध असतानाही तो कार्यक्रम घेण्यात आला त्याला आम्ही वेळागरवासीयांनी योग्य ते उत्तर लवकरच देणार आहोत. मुळात केसरकर यांना हा प्रकल्प होणे म्हणजे येणाऱ्या निवडणुकीसाठी कमिशन व फंड जमा करण्याचा प्रयत्न होता. त्यामुळे ते स्वावार्थी झाले असून त्यांना मतदारांशी किंवा आम्हा भूमिपुत्रांशी काही संबंध नाही फक्त घोषणा करून फंड कसा मिळवायचा ह्याच विचारात ते असतात परिणामी पुन्हा या ठिकाणी आलात तर याद राखा या पुढचेही पाऊल आम्ही वेळागरवासीय उ,चलू असा इशारा सामाजिक कार्यकर्ते तथा माजी आमदार परशुराम उपरकर समर्थक आबा चिपकर यांनी दिला आहे.


