Wednesday, October 29, 2025

Buy now

spot_img

दडपशाहीच्या जोरावर आंदोलन दडपून भूमिपूजनाचा घाट घालणं लोकशाहीला घातक.! : मनसे वेळागरवासियांच्या पाठीशी : जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर.

वेंगुर्ले :  विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता केव्हाही जाहीर होऊ शकते याची पुरेपूर जाण् असलेल्या शिक्षण मंत्री दिपक केसरकर व गिरीश महाजन यांनी वेळागरच्या समुद्र किनारी ताज समूहाच्या पंचतारांकित हॉटेलचे भूमिपूजन वेळागर वासियांचा प्रचंड विरोध डावलून पोलीस बळाचा वापर करून घाईगडबडीत पूर्ण केले. एका भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला एवढ्या मोठ्या प्रमाणात स्थानीक भूमिपुत्र विरोध करत असताना या ग्रामस्थांना भेटून त्यांच्या शंकांचं समाधान करणं गरजेचं होत. वेळागर वासियांचा या प्रकल्पाला विरोध नाही मात्र या प्रकल्पाच्या नावाखाली जी अतिरिक्त जमीन बळकावण्यात आलेली आली ती जमीन वगळून हा प्रकल्प करा अस या प्रकल्पग्रस्तांच म्हणणं आहॆ. गेली अनेक वर्ष याच मागणीसाठी वेळागर वासियांनी हे आंदोलन शांततेच्या मार्गाने चालू ठेवलेले आहॆ. मात्र वेळोवेळी सरकार दरबारी दार ठोठावून देखील खोटी आश्वासन पदरी पडल्यामुळे निराश झालेली हे आंदोलक त्यांना विश्वासात न घेतल्यामुळे प्रचंड आक्रमक झालेले आहेत. त्यावर योग्य तोडगा न काढता निवडणुकीच्या प्रचारात प्रचारासाठी आणखी एक मुद्दा मिळेल व याचा राजकीय फायदा उठवता येईल या फक्त एकाच विचाराने कालचा भूमिपूजनाचा कार्यक्रम उरकण्यात आला. कोकणी जनता प्रचंड संयमी आहॆ मात्र जेव्हा अस्थित्वाची लढाई असते तेव्हा ती मागे हटत नाही हा इतिहास आहॆ. कालच आंदोलन देखील त्याचच प्रतीक होत मात्र पोलीस बळाचा वापर करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला गेला हे निषेधार्ह आहॆ. पर्यटन वाढीसाठी आपल्या जिल्ह्यात पंचतारांकित हॉटेल आलीच पाहिजेत पण भूमिपुत्रांना विस्थापित करून जर कोण असे प्रकल्प राबवत असेल तर मनसे स्थानीक भूमिपुत्रांच्या बाजूने ठाम पणे उभी राहील, अशी ग्वाही मनसे जिल्हाध्यक्ष अँड. अनिल केसरकर यांनी वेळागरवासियांना दिली आहॆ.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles