सावंतवाडी : येथील कळसुलकर हायस्कूलचा माजी विद्यार्थी, तसेच उपक्रमशील सेवानिवृत्त शिक्षक श्री. संतोष वैज व प्राथमिक शिक्षिका सौ. वैज यांचे चिरंजीव अभिनव वैज हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होऊन कृषी विभागातील वर्ग दोन अधिकारी पदी निवड होऊन महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागात नुकतेच रुजू झाले आहेत.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा), मुंबई येथे अभिनव वैज हे ‘तंत्र अधिकारी’ (वर्ग -२) पदावर नुकतेच शासनाचा सेवेत रुजू झाले आहेत. अभिनव यांच्या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे.


