Wednesday, October 29, 2025

Buy now

spot_img

कितीही वेळा अर्ज भरला तरी…! : मंत्री दीपक केसरकर यांचा तेलींवर हल्लाबोल. ; २९ रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार.

सावंतवाडी : महायुतीचा उमेदवार म्हणून 29 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. राजन तेलींनी कुठल्या पक्षाची उमेदवारी भरली?, मागच्यावेळी त्यांनी राष्ट्रवादीतून अर्ज भरला होता. दुसऱ्या दिवशी भाजपचा भरला. त्यामुळे कितीही वेळा अर्ज भरला तरी लोकांची मतं नसतील तर निवडून येता येत नाही, असा टोला मंत्री दीपक केसरकर यांनी हाणला. सावंतवाडी येथील आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

श्री. केसरकर पुढे म्हणाले, लोकमत आमच्याकडे असून लोकांच्या प्रेमामुळे मी निवडून येणार आहे‌.तेलींनी कितीही अर्ज भरले तरी मतं पडणार नाहीत. तसेच विशाल परब यांची नाराजी वरिष्ठ दूर करतील असंही, ते म्हणाले. अर्चना घारेंना महिला आहेत म्हणून महिलांची मत पडणार नाहीत. लाडके भाऊ एकनाथ शिंदे यांच्या पाठिशी महिला राहतील, असे मत व्यक्त केले.

दरम्यान, चिपी विमानतळाच्या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच लक्ष वेधणार आहे. विमानसेवा बंद होणार नसून मुंबई रूट दुसऱ्या एयर लाईनला दिला जाणार आहे. बाळासाहेबांनी निर्माण केलेल्या धनुष्यावर बोलण्याचा पूर्वी कॉग्रेसमध्मे असलेल्या वैभव नाईक यांना अधिकार नाही. आता कॉग्रेससोबत गेल्यानं त्यांना जोर वाटत असला तरी शिवसैनिकांना ते मान्य नाही. २७ हजारांच लीड ५० हजारांवर जाईल अन् निलेश राणे विजयी होतील, असा विश्वास दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. तर सावंतवाडी मतदारसंघ सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी शिवसेना पक्ष आणि महायुती कडून मंगळवारी दि. २९ ऑक्टोबर २०२४ रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. यावेळी महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन केसरकर यांनी केले आहे. याप्रसंगी शिवसेना जिल्हा संघटक संजू परब, जिल्हा प्रमुख अशोक दळवी, तालुकाप्रमुख बबन राणे, शहरप्रमुख खेमराज कुडतरकर, हेमंत बांदेकर, सत्यवान बांदेकर, मंदार नार्वेकर, दिना नाईक, विनोद सावंत, संजय वरेरकर, योगेश नाईक, क्लेटस फर्नांडीस यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles