सावंतवाडी: शिवसेना पक्षाच्या जिल्हा संघटक पदी (कार्यक्षेत्र सावंतवाडी विधानसभा) माजी नगराध्यक्ष संजू परब यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सचिव संजय मोरे यांनी ही निवड केली आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना पक्षाच्या जिल्हा संघटक पदी (कार्यक्षेत्र सावंतवाडी विधानसभा) माजी नगराध्यक्ष संजू परब यांची नियुक्ती करण्यात येत आहे. नियुक्तीचा कालावधी एक वर्षाचा असेल, वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण याचा सक्रीयपणे प्रचार आणि प्रसार कराल तसेच शिवसेना पक्ष वाढीसाठी आपण सर्वांना सोबत घेऊन कार्य कराल, असा विश्वास सचिव संजय मोरे यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान मंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यालयात संजू परब यांचे अभिनंदन करण्यात आले.