सावंतवाडी : माहेर प्राणापेक्षा प्रिय असते. जीव ओवाळून टाकणारी माणसं माझ्या माहेरात आहे. त्यामुळे महिला, युवकांच्या अश्रूंची किंमत आम्हाला आहे. त्यामुळे तुमचा आवाज बनून मी लढणार आहे. आता रडायचं नाही तर लढायच आहे. निष्ठावंत काय असतो ? ते दाखवून देऊ अशा भावना अपक्ष उमेदवार अर्चना घारे-परब यांनी व्यक्त केल्या. मी महाआघाडीवर नाराज नाही. पण, ही लढाई निष्ठावंतांची, स्वाभिमानाची आहे. त्यामुळे मी अपक्ष लढणार आहे. २०१९ ला माघार घेतली. आता माघार नाही. हा मतदारसंघ सुसंस्कृत आहे त्याला गालबोट लागू देणार नाही, अस मत घारेंनी व्यक्त केले. सावंतवाडी येथील आयोजित मेळाव्यात त्या बोलत होत्या.
त्या म्हणाल्या, गेली आठ वर्षे मी इथे काम करत आहे. या आठ वर्षात लोकांच प्रेमरूपी संपत्ती मी मिळवली. हे कुणाच्या नशिबात नसते. पण, ते भाग्य माझ्या नशिबात आहे. महाविकास आघाडीची उमेदवारी मिळेल याची खात्री होती. एबी फॉर्म घरी येईल यात शंका नव्हती. त्यामुळे मुंबईत न जाता दोडामार्गात शाळेच छप्पर कोसळले तिथे जाऊन मुलांना धीर दिला त्यांची सोय केली. पण, तोवर आपलं तिकीट कापलं जाईल अशी बातमी समोर आली. उबाठा शिवसेनेत पक्षप्रवेश घेण्यात आला. महाविकास आघाडीच्या गणितात आपलं तिकीट बसत नाही हे लक्षात आलं. शेवटी पदरात तिकीट पडलं नाही. ज्यांनी अडीअडचणी काम केलं त्यांना काय सांगावं हे समजेना. म्हणून आजचा मेळावा आयोजित करण्यात आला. प्रत्येकाच भाषण मी ऐकल. मी महाआघाडीवर नाराज नाही. पण, ही लढाई निष्ठावंतांची आहे. स्वाभिमानाची आहे. त्यामुळे मी अपक्ष लढणार आहे. २०१९ ला माघार घेतली. आता माघार नाही. ही लढाई माझी नाही, तुमची आहे. हा मतदारसंघ सुसंस्कृत आहे त्याला गालबोट लागत आहे. यावर भविष्यात बोलू. माझा विकासाचा रोडमॅप ठरला आहे. महिला, युवकांच्या अश्रूंची किंमत आम्हाला आहे. त्यामुळे तुमचा आवाज बनून मी लढणार आहे. आता रडायचं नाही तर लढायच आहे. निष्ठावंत काय असतो ते दाखवून देऊ अशा भावना अपक्ष उमेदवार अर्चना घारे-परब यांनी व्यक्त केल्या.