Wednesday, October 29, 2025

Buy now

spot_img

काँग्रेसची १६ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर, माणिकराव ठाकरे ते सचिन सावंतांना उमेदवारी. ; कोणाला मिळाली संधी?

मुंबई : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज (दि.26) तिसरी यादी जाहीर केली आहे. काँग्रेसने आज सकाळीच दुसरी उमेदवार यादी जाहीर केली होती. त्यानंतर आजच तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसच्या तिसऱ्या यादीत 16 जणांना संधी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे क्रॉस वोटिंग मोहन हंबर्डे यांना नांदेड दक्षिम मैदानात उतरवण्यात आले आहे. तर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांना अंधेरी पश्चिममधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

काँग्रेस पक्षाची तिसरी उमेदवार यादी –

1. राणा सानंदा – खामगाव
2. हेमंत चिमोटे – मेळघाट
3.मनोहर पोरेटी – गडचिरोली
4. दिग्रस – माणिकराव ठाकरे
5. नांदेड दक्षिण – मनोहर अंबाडे
6.देगलूर – निवृत्तीराव कांबळे
7. मुखेड – हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर
8. एजाज बेग – मालेगाव मध्य
9. शिरीष कुमार कोतवाल – चांदवड
10. लकीभाऊ जाधव – इगतपुरी
11. भिवंडी पश्चिम -दयानंद चोरघे
12. अंधेरी पश्चिम – सचिन सावंत
13. वांद्रे पश्चिम – असिफ झकारीया
14. तुळजापूर – कुलदीप पाटील
15. कोल्हापूर दक्षिण – राजेश लाटकर
16. सांगली – पृथ्वीराज पाटील

काँग्रेसकडून विधानसभेसाठी नांदेड दक्षिणमधून पुन्हा आमदार मोहन हंबर्डे यांना उमेदवारी जाहीर झाली तर मुखेड मतदासंघातून माजी आमदार हणमंत पाटील बेटमोगरेकर यांना संधी देण्यात आली आहे. देगलूर मधून निवृत्ती कांबळे यांना उमेदवारी जाहीर झाली. यापूर्वी देगलूरचे आमदार जितेश अंतापूरकर काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेले होते. चांदवड विधानसभा मतदार संघातून माजी आमदार शिरीष कोतवाल यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजपच्या राहुल आहेर विरुद्ध काँग्रेसचे शिरीष कोतवाल अशी लढत होणार आहे.

भिवंडी पश्चिमची जागा अखेर काँग्रेसला मिळाली आहे. या जागेवरून राष्ट्रवादी शरद पवार गटही आग्रही मोठ्या प्रमाणात होता. मुस्लिम उमेदवार द्यावा यासाठी पक्षात मोठी लॉबिंग सुरू होती. अखेर दयानंद चोरगे यांनाही जागा देण्यात आली आहे. लोकसभेला डावलल्यानंतर विधानसभेला दयानंद चोरगे यांना खुश करण्याचा पक्षाचा प्रयत्न करण्यात आलाय.

काँग्रेसच्या 23 उमेदवारांची दुसरी यादी जाहिर –

भुसावळ – राजेश मानवतकर
जळगाव – स्वाती वाकेकर
अकोट – महेश गणगणे
वर्धा – शेखऱ शेंडे
सावनेर – अनुजा केदार
नागपूर दक्षिण – गिरीश पांडव
कामठी – सुरेश भोयर
भंडारा – पूजा ठवकर
अर्जुनी मोरगाव – दिलिप बनसोड
आमगाव – राजकुमार पुरम
राळेगाव – वसंत पुरके
यवतमाळ – अनिल मांगुलकर
आर्णी – जितेंद्र मोघे
उमरखेड – साहेबराव कांबळे
जालना – कैलास गोरंट्याल
औरंगाबाद पूर्व : मधुकर देशमुख
वसई : विजय पाटील
कांदिवली पूर्व -:काळू बधेलिया
चारकोप – यशवंत सिंग
सायन कोळिवाडा : गणेश यादव
श्रीरामपूर : हेमंत ओगले
निलंगा : अभय कुमार साळुंखे
शिरोळ : गणपतराव पाटील

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles