अखेर दत्ता सामंत यांचाही शिंदे शिवसेनेत प्रवेश.! ; निलेश राणेंना निवडूनच आणण्याचा केला निर्धार.!

मुंबई / मालवण  : येथील कट्टर राणे समर्थक तथा भाजप नेते दत्ता सामंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शनिवारी रात्री शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला. त्यांच्या समवेत असंख्य भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी धनुष्यबाण हाती घेत निलेश राणे यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचा निर्धार मुख्यमंत्र्यांच्या समोर केला.

शनिवारी दत्ता सामंत यांनी भाजप नेते खासदार नारायण राणे यांची भेट घेत आपण राणे कुटुंबीय यांच्यासोबत कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत दाखल होण्याचा निर्णय घेतला होता. त्यांचा पक्षप्रवेश रविवारी सकाळी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. मात्र, शनिवारी रात्रीच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते धनुष्यबाण हाती घेतला. यावेळी माजी खासदार निलेश राणे, रवी फाटक, बाळ चिंदरकर उपस्थित होते. प्रमुख कार्यकर्त्यांमध्ये राजा गावकर, अनिल कांदळकर, जेरॉन फर्नांडिस, संतोष साटविलकर, मंदार लुडबे, सुनील घाडीगावकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles