सावंतवाडी: सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे सुरक्षारक्षक सुर्यकांत आडेलकर यांनी ओरोस येथे व महेंद्र डुबळे यांनी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय जात रक्तदान करत रूग्णांना जीवनदान दिले. भाग्यश्री राऊत आणि श्रीदेवी तेरसे या महिला रुग्णांना जीवदान दिले.अत्यंत तातडीने दुर्मिळ O निगेटिव्ह या रक्ताची आवश्यकता असताना युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांच्या माध्यमातून धाव घेत पवित्रदान केलं.यासाठी ओ निगेटिव्ह या रक्तगटाची आवश्यकता असल्याने रक्तदात्यांअभावी रूग्णांची गैरसोय होत होती. यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर यांनी देव्या सुर्याजी यांच्याशी संपर्क साधत तातडीने रक्तदाते उपलब्ध करण्यास सांगितले.त्वरीत रक्तदाते उपलब्ध झाल्याने रूग्णांच्या नातेवाईक व डॉक्टर यांनी युवा रक्तदाता संघटनेचे व रक्तदात्यांचे आभार मानले.
शाब्बाश भावान्नू.! – भाऊबीज दिनी जपलं रक्ताचं नातं, समाजाला दिलाय आदर्श.!
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


