वेंगुर्ला : दीपावली सणानिमित्त आयोजित फराळाच्या कार्यक्रमानिमित्त सावंतवाडी मतदार संघातील अपक्ष उमेदवार अर्चना घारे – परब यांनी उपस्थित राहून सर्व उपस्थितांना दीवाळीनिमित्त, तसेच भावा – बहिणीचं नात वृध्दिंगत करणाऱ्या भाऊबीजेच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी उपस्थित महिला वर्गातून आजच्या या सत्तेमध्ये असलेल्या नेत्यांनी कोणतीही विकासात्मक किंवा धोरणात्मक अशी कामं केली नाहीत, याची खंत सौ. घारे यांच्याजवळ व्यक्त केली. तसेच आता ”ताई तुम्ही निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलात तर तुम्ही विजयी होऊन आमचा महिलांचा आवाज बनून आमच्यासाठी कार्य करा.!, अशा अपेक्षा देखील महिला वर्गाने बोलून दाखवल्या.
यावेळी उपस्थिताना संबोधित करताना अर्चना घारे – परब म्हणाल्या, मी आता यावेळी लढणार आणि जिंकणाचं.!, आणि जिंकून आल्यावर सर्व प्रथम ज्या पद्धतीने वेंगुर्ला, सावंतवाडी व दोडामार्ग शहराला जशी चांगल्या दर्जाची ओळख होती ती आज कुठे तरी कमी होत चालली आहे तर ते गतवैभव पुन्हा मी निर्माण करण्यासाठी कटिबद्ध राहिन. तसेच इथल्या आरोग्य विषयक, रोजगार विषयक ज्या काही उणिवा आहेत, त्या देखील पूर्णत्वास नेण्याच्या दृष्टीने मी कटिबद्ध राहिन, असा शब्द दिला. त्याचबरोबर या दिवाळी फराळ कार्यक्रमाचे आयोजन वेंगुर्ला येथील मांजरेकर परिवाराच्या वतीने केल्याबद्दल त्यांचे आभार देखील सौ. घारे यांनी मानले.
यावेळी योगेश कुबल, विनायक परब, विक्रांत कांबळी, सौ. दीपिका राणे, सौ.अदिती चुडजी, सायली पांगम, ऋतिक परब, विवेक गवस आदी पदाधिकारी उपस्थित होते.


