सावंतवाडी : पूजा कळंगुटकर (वय वर्ष 25) ही युवती वेतोरे परिसरातील रहिवासी असून गोवा येथील खासगी कंपनीमध्ये ती व तिची सख्खी बहीण कामाला आहे. मामाचा अपघात झाला आहे तुम्ही घरी या असं घरून फोन आला होता. त्यावेळी त्या दोन सख्ख्या बहिणी कामावरून वेतोरे येथे जाण्यासाठी सावंतवाडी वेंगुला स्टैंडवर बसची वाट पाहत होती.
भाऊबीज साठी वेतोरा येथे गेलेला तिच्या मामाचा रिक्षेला धडकून अपघात झाला व त्यात सदर अविवाहित मामाचा जागीच मृत्यू झाला ही बातमी घरातील व्यक्तीने थेट त्यावेळी त्या मुलीला फोन करून सांगितली असता ती मुलगी सावंतवाडी वेंगुर्ला बस स्थानकावर फीट येऊन रस्त्यावरच बेशुद्ध अवस्थेत पडली तिची मोठी बहीण खूप घाबरलेल्या अवस्थेतहोती व रडत रडत तिला कांदा लावत होती तेवढ्यात सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव यांनी येथे धाव घेतली व तिला लगेच रिक्षामध्ये घालून सावंतवाडी कुटीर रुग्णांना दाखल करून तिच्या नातेवाईकांना कल्पना दिली.
त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने तिच्या डोक्याचं सिटीस्कॅन करून तिच्यावर अधिक उपचार सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये सुरू आहे तिची प्रकृती आता स्थिर असून तिला घरी पाठवण्यात आले. हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या नातेवाईकांनी सामाजिक बांधिलकीच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले. याप्रसंगी डॉक्टर व सामाजिक बांधिलकीचे कार्यकर्ते रवी जाधव व रूपा मुद्राळे यांचे मोठे सहकार्य लाभले.
मामाच्या अपघाताची बातमी ऐकताच भाची चक्कर येऊन कोसळली, रवी जाधवांनी तात्काळ रुग्णालयात केले दाखल ; सावंतवाडीत पुन्हा मदतीला धावली ‘सामाजिक बांधिलकी’.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


