Monday, June 16, 2025

Buy now

spot_img

यापुढे जनताच ‘हा’ चक्रव्यूह भेदणार, कठीण परिस्थितीतही शेवटी विजय माझाच.! – विशाल परब यांचा ठाम विश्वास.

सावंतवाडी : आज हजारो वर्षानंतरही कोवळ्या वयातला तो अभिमन्यू लोकांच्या स्मृतीत आहे तो त्याच्या लढण्यामुळेच! महाभारतात त्यावेळच्या नावाजलेल्या एकेका रणधुरंदर योद्धांनी त्याला पराभूत करण्यासाठी भक्कम चक्रव्यूह रचला, पण ते त्या अभिमन्यूची नैतिकता, शौर्य आणि हिंमत युगानुयुगे नाकारू शकले नाहीत! त्याप्रसंगी अभिमन्यूचा पराभव झाला कारण योग्य वेळी सैन्याची ताकद त्यांच्या पाठीशी उभी राहू शकली नाही! आज परिस्थिती तेवढ्या अर्थाने नक्कीच वेगळी आहे की मला एकटे पाडण्यासाठी काही राजकीय पक्ष आणि इथले प्रस्थापित सत्ताधारी एकवटले असले तरीही… जनता माझ्या सोबत आहे! भक्कमपणे आहे!! योग्य वेळी योग्य निर्णय घेत परिवर्तन करण्याच्या पूर्ण मूडमध्ये आज जनता आहे. म्हणूनच कितीही ताकद लावली, दहशत माजवली आणि दबाव आणला तरीही…. लोकंही आपल्यासोबत! कार्यकर्तेही आपल्यासोबतच! म्हणून.. विजय आपलाच! जनतेच्या मनातला “विशाल” विजय आता निश्चित!, अशी प्रतिक्रिया अपक्ष उमेदवार तथा यशस्वी युवा उद्योजक विशाल परब यांनी व्यक्त केली.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles