सावंतवाडी : सांगेली देवकरवाडी येथील अजित दत्ताराम नाईक (वय ५८) याला गोवा बनावटीच्या दारूच्या बेकायदेशीर विक्रीप्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून सुमारे ९ हजार रुपये किमतीच्या ‘नॅशनल डॉक्टर’ ब्रँडच्या ७५ दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाईक याने सदर दारूचा साठा विक्रीच्या उद्देशाने बेकायदेशीररीत्या ठेवला होता. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. कारवाईदरम्यान दारूचा संपूर्ण साठा जप्त करण्यात आला.
ही कारवाई महिला पोलीस उपनिरीक्षक माधुरी मुळीक, पोलीस हवालदार श्रीमती दूधवडकर आणि पोलीस हवालदार दीपक शिंदे यांच्या पथकाने गुरुवारी (दि. १८) रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास केली. यानंतर उशिरा सावंतवाडी पोलीस ठाण्यात नाईक याच्याविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.
सांगेली येथे गोवा बनावटीच्या दारूचा साठा जप्त. ; एकास अटक.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]



