RPD ज्युनिअर कॉलेजमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा उद्या सत्कार! ; संस्थाध्यक्ष तथा जि. प. सदस्य विक्रांत सावंत यांच्या हस्ते १२ वीतील यशस्वी विद्यार्थ्यांच्या गौरव!

सावंतवाडी : शिक्षण प्रसारक मंडळ, सावंतवाडी संचलित राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, सावंतवाडी येथे इयत्ता बारावी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शनिवार, दि. २० जून २०२६ रोजी सकाळी १० वाजता नवऱंग कलामंच येथे होणार आहे.

समारंभाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने होईल. त्यानंतर प्रा. कांबळे एस. आय. यांच्या हस्ते प्रास्ताविक व स्वागत करण्यात येणार आहे. कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार असून विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव केला जाणार आहे.

यावेळी पालकांचे मनोगत, प्रभारी मुख्याध्यापिका डॉ. सुमेधा नाईक यांचे मनोगत तसेच शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विक्रांत विकासभाई सावंत यांचे अध्यक्षीय मनोगत होणार आहे.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. वाडकर पी. एन. तर सूत्रसंचालन प्रा. ठाकूर डब्ल्यू. सी. करणार आहेत.

या सत्कार सोहळ्यास विद्यार्थी, पालक, माजी विद्यार्थी व शिक्षणप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करणारा हा सोहळा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles