राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत कणकवली विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेचा विद्यार्थी मोहित सुतार अव्वल!

कणकवली, प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेचा विद्यार्थी कु. मोहित सुतार याने प्रथम क्रमांक पटकावून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

राज्यभरातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी मुख्याध्यापक महामंडळामार्फत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये चित्रकला, निबंध आणि वक्तृत्व स्पर्धांचा समावेश होता. यंदाचे राज्यस्तरीय कृतीसत्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली येथे पार पडले. सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष वामन तर्फे आणि सहकाऱ्यांनी या कृतीसत्राचे उत्कृष्ट नियोजन केले.

स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार कोकण विभाग शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आला. चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल कु. मोहित सुतार याचा विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत विशेष गौरव करण्यात आला.

शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव श्री. वळंजू तसेच विश्वस्त श्री. डेगवेकर यांच्या हस्ते मोहितचा सत्कार करण्यात आला. त्याला कला शिक्षक श्री. प्रसाद राणे यांचे मार्गदर्शन लाभले.

यावेळी मुख्याध्यापक पी. जे. कांबळे, पर्यवेक्षक श्री. वणवे, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोहितच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून त्याचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles